...या कारणामुळे माजी चॅम्पियन कुझनेत्सोव्हा यूएस ओपनमधून माघार घेते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020
  • जागतिक क्रमवारीत ३२ व्या महिला टेनिसपटू स्वेतलाना कुझनेत्सोव्हाने कोरोनामुळे वर्षातील चौथे ग्रँड स्लॅम यूएस ओपनमधून स्वता:चे नाव मागे घेतले आहे.
  • यूएस ओपन ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांशिवाय खेळला जाईल.

न्यूयॉर्क :- जागतिक क्रमवारीत ३२ व्या महिला टेनिसपटू स्वेतलाना कुझनेत्सोव्हाने कोरोनामुळे वर्षातील चौथे ग्रँड स्लॅम यूएस ओपनमधून स्वता:चे नाव मागे घेतले आहे. यूएस ओपन ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांशिवाय खेळला जाईल. पण, कोविड -१९ मुळे अनेक खेळाडूंनी ही नाव मागे घेतले असून कुझनेत्सोवाचे नावही या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे.

२००४ मध्ये यूएस ओपन विजेतेपद जिंकणार्‍या कुझनेत्सोव्हा यांनी सोशल मीडियावर हे नाव मागे घेत असल्याची माहिती दिली. कुझनेत्सोव्हाने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, 'मला वाईट वाटते कारण मी या स्पर्धेची बरीच काळा पर्यंत प्रतीक्षा करीत होती, परंतु या महामारीने सर्व योजना नष्ट केल्या आहेत.'

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Друзья! В связи с неблагоприятной ситуацией из-за короновируса, а также отсутствием возможности организовать необходимые перелеты для сбора моей команды, я приняла сложное для себя решение – отказаться от участия в Cincinnati и US Open Мне очень жаль, так как я сильно ждала этих турниров, но пандемия изменила все планы. Надеюсь, что к следующим соревнованиям ситуация в мире станет стабильнее. Всем участникам и болельщикам желаю удачи и здоровья! Берегите себя и своих близких! // Dear friends, Due to an unfavorable situation caused by coronavirus, and therefore the inability get together all my team I made a difficult decision to refuse to participate in Cincinnati and the US Open I feel very sad, because I have been waited for these tournaments so much, but the pandemic changes all plans. I hope the situation will be more positive by the next tournaments. I wish good luck and strong health to all participants and fans! Take care of yourself and your family!

A post shared by Svetlana Kuznetsova/ Кузнецова (@svetlanak27) on

पहिला नंबर वर – १ ऑस्ट्रेलियाचा एश्ले बार्टीने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अनेक स्टार खेळाडूंनी त्याचा मार्ग पकडला. गेल्या आठवड्यात जगातील पाचव्या क्रमांकाची खेळाडू इलिना स्विसोलिना, क्रमांक - ७ नंबरची किकी बर्टेनसनेही यूएस ओपनमधून माघार घेतली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News