बाबो! 6 हजार mAh बॅटरीसह रिअलमीचा C12 फोन लॅंच; जाणून घ्या किंमत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 August 2020

खास गोष्ट म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी किंमत फोनची असणार आहे. या फोनमध्ये मीडिया टेक हेलीओ जी35 प्रोसेसर सह 6 हजार mAh बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमीचा कंपनीचा आकर्षक समार्टफोन भारतामध्ये 18 ऑगस्ट २०२० रोजी लॉन्च होणार आहे. यापूर्वी इंडोनेशिया शहरात हा फोन लाँच करण्यात आला, खास गोष्ट म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी किंमत फोनची असणार आहे. या फोनमध्ये मीडिया टेक हेलीओ जी35 प्रोसेसर सह 6 हजार mAh बॅटरी देण्यात आली आहे. रियलमी सी१२ मध्ये सिंगल ३ जीबी रॅम आणि 32 जीबी एक्स्टर्नल मेमरी देण्यात आली आहे. सरासरी याची किंमत दहा हजार रुपये असणार आहे.  ग्राहकांना ब्ल्यू मरीन आणि कोरल रेड  या दोन कलरमध्ये हा समार्टफोन उपलब्ध होईल.

जाणून घ्या वैशिष्ट्यै

रियलमी सी १2 मोबाइलमध्ये आकर्षक फिचर देण्यात आली. डबल सिम नॅनो सपोर्ट करणार आहेत. अँड्रॉइड दहा बेस्ट रियलमी युआयवर हा फोन चालणार आहे. त्याचबरोबर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. 6.5 इंच एचडी प्लस एलईडी डिस्प्ले आहे. ३ जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले. 2.3GHz ऑक्टकोर मीडिया टेक हेलीओ जी35 प्रोसेस देण्यात आले. मेमरीकार्डने 32 जीबीपर्यंत इक्सटर्नल स्टोरोज वाढवण्याची क्षमता आहे. 

कॉमेरा

फोटो काढण्यासाठी विशेष ट्रिपल कॅमेरा देण्यात आला. प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल, सेकंडरी 2 मेगापिक्सल आणि थर्डरी 2 मेगापिक्सल  देण्यात आला. सेल्फी काढण्यासाठी फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. वेगवेगळे फोटो शॉट घेण्यासाठी अनेक फिचर देण्यात आले. ब्युटी मोड, पोट्रेट नाईट, टाइम लाईन, स्लो मोशन असे फीचर मोबाईल मध्ये आहेत. रियलमी सी१२ मोबाईलच खास वैशिष्ट्य6 हजार mAh बॅटरी 10वॅटवर चार्ज होईल. त्याचबरोबर ब्लूटूथ, मायक्रो एसडी कार्ड, हेडफोन यांसाठी वेगळे सॉकेट देण्यात आले. फिंगरप्रिंट हा नवा ऑप्शन मोबाईल मध्ये उपलब्ध आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News