खरं सांगतो

उर्मिला शहा
Friday, 2 August 2019

खरं सांगतो रुसलीस तू की, घर सारं होतं  मुकं 
हसल्यावर तू क्षणामधे विरून जातं सारं धुकं
आजच का मग मनामध्ये एवढा राग धरलास?

खरं सांगतो रुसलीस तू की, घर सारं होतं  मुकं 
हसल्यावर तू क्षणामधे विरून जातं सारं धुकं
आजच का मग मनामध्ये एवढा राग धरलास?
"जातेच आता निघून कशी " शब्द शब्द खरा केलास.

आता तरी ऊठ ना गं मनी धरू नको राग.
तूच ऊठून सांग ना हा गंमतीचाच होता भाग
बघ तिकडे बाबा कसा भांबावून  गेला आहे. 
तुझ्या अशा वागण्याने सैरभैर  झाला आहे.

 चुकले असेल आमचे काही  एकदा माफ कर ना.
विसरून सारे उठून पुन्हा  कुशीत जरा घे ना.
करून देईन मग चहा फक्कड  चेपून देईन  पाय
राग तुझा घालवण्यासाठी  करीन काहीही उपाय

नको पाहूस अंत आता किती किती  मारू हाका?
कसे आवरू अश्रू अन् सांग कसा आवरू हुंदका?
ऊठ ना गं ऊठ आई डोळे उघडून  बघ ना
पोरकं करून आम्हाला अशी  जाऊ नको ना.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News