लिफ्ट देऊन करायची असली कामे....

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

एसटी बसची वाट पाहत असलेल्या ज्येष्ठ महिलांना लिफ़्ट देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसवून व त्यांना एअरगन  पिस्टलचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याच टोळीने मावळ तालुक्यात सहा ठिकाणी आशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. विकास तुकाराम जाधव (रा. कामशेत), संतोष वडेकर (रा. नाणे रोड, कामशेत), नागेश गायकवाड व सुदाम भांगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वडगाव मावळ : एसटी बसची वाट पाहत असलेल्या ज्येष्ठ महिलांना लिफ़्ट देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसवून व त्यांना एअरगन  पिस्टलचा महिलांना धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याच टोळीने मावळ तालुक्यात सहा ठिकाणी आशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. विकास तुकाराम जाधव (रा. कामशेत), संतोष वडेकर (रा. नाणे रोड, कामशेत), नागेश गायकवाड व सुदाम भांगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण जाधव व वडेकर या दोघांना अटक केली आहे. सात डिसेंबर रोजी कान्हे फाटा येथे एसटीची वाट पहात बसलेल्या चिंधाबाई राधू पवार व अनुसया लाला करवंदे यांना मोटारीत बसवून लुटले होते.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक पद्‌माकर घनवट यांनी पृथ्वीराज ताटे, विजय पाटील, प्रकाश वाघमारे, सचिन गायकवाड, शब्बीर पठाण, गणेश महाडीक, रौफ इनामदार यांचे पथक तयार केले होते. शुक्रवारी ते कान्हे फाटा येथे थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने छापा टाकून इरटिगात बसलेल्या जाधव व वडेकर यांना ताब्यात घेतले. गायकवाड व भांगरे हे दोघे पळून गेले.

आरोपींनी वडगाव हद्दीत दोन, कामशेत हद्दीत एक, चाकण हद्दीत एक व लोणावळा ग्रामीण हद्दीत एका ठिकाणी असे गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता असून, पीडितांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाला रोख बक्षीस जाहीर केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News