रिअल सिंघम ! हा पोलीस आधिकारी मजुरांच्या मुलांना देतो मोफत शिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020
  • कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून  लॉकडाऊन सुरू झाले होते.
  • लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय, शाळा आणि महाविद्यालय बंद पडले त्यामुळे मजुरांचे कामधंदे देखील बंद पडले.

बंगळुरू :-  कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून  लॉकडाऊन सुरू झाले होते. लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय, शाळा आणि महाविद्यालय बंद पडले त्यामुळे मजुरांचे कामधंदे देखील बंद पडले. जिथे खायची भ्रांत अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण घेणे तर फक्त कोसो दूरची गोष्ट आहे अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या महासंकटात देखील देवासारखे वेगवेगळ्या रुपाने पोलीस धावून आले. आता मजुरांच्या मुलांसाठी पोलीस उप-निरीक्षक मदतीला आले आहेत. कर्नाटक राज्यातील बंगळुरू इथल्या अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात पोलीस उप-निरीक्षक शांथप्पा जीदमनव्वर हे मजुरांच्या मुलांचे आयुष्य वाया जाऊ नये यासाठी त्यांना शिकवत आहेत.

 

 

 

ज्या मजुरांची मुले स्मार्टफोन घेऊ शकत नाहीत. ज्यांना ऑनलाइन शिक्षण शक्य नाही अशा मुलांना पोलीस अधिकारी आपल्या ड्युटीनंतर वेळ काढून रोज शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या या कामाचे सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. तर स्थानिक लोकांनी रियल हिरो आणि रियल सिंघम असे ही नाव दिले आहे.

या आधी ही सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मदत केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. शांथप्पा ड्यूटीवर जाण्यापूर्वी मुलांना शिकवतात. ते रस्त्याच्या कडेला बोर्ड घेतात आणि मुलांना जमिनीवर ठेवून त्यांना विनामूल्य शिक्षण देतात. मुलांनी मोलमजुरी अडकू नये किंवा सुविधा मिळत नाही म्हणून त्यांचे वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पोलीस उप-निरीक्षक आपल्या कार्यासोबतच हे कार्य अगदी नियमितपणे पार पडत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News