रेडिमेड पितांबरचा मस्तानी थाट!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 21 August 2019

नऊवारीमध्ये फेमस असलेले पेशवाई, शाही मस्तानी पॅटर्न आता पितांबरामध्ये उपलब्ध झाल्याने तरुणाईला हे पॅटर्न विशेष पसंतीस उतरत आहे.
आजच्या तरुणाईला प्रत्येक वेळी नवी फॅशन हवी असते. म्हणून पेशवाई, शाही मस्तानी आणि या वर्षी मयुरपंख पॅटर्नमधील रेडिमेड पितांबर आम्ही तयार के
ले

 

गणेशोत्सव म्हटला की पारंपरिक कपड्यांना खूप महत्त्व येते. घरात गणपतीच्या पूजा करण्यासाठी पितांबर व उपरणे नेसावे लागते. आता बाजारामध्ये रेडिमेड पितांबार मिळत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत पितांबर उपलब्ध आहे. त्यामुळे पितांबर नेसण्यापेक्षा रेडिमेड पितांबरची खरेदी तरुण मुले करताना दिसतात. रेडिमेड पितांबरमध्ये ओचा, पेशवाई आणि शाही मस्तानी पॅटर्न उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तरुणांना रेडिमेड पितांबरमध्ये वैविध्य पाहण्यास मिळते.

नऊवारीमध्ये फेमस असलेले पेशवाई, शाही मस्तानी पॅटर्न आता पितांबरामध्ये उपलब्ध झाल्याने तरुणाईला हे पॅटर्न विशेष पसंतीस उतरत आहे. खासकरून आजच्या तरुणाईला पारंपरिक कपड्यांमध्ये वैविध्य दिले तर त्या कपड्यांकडे तरुणाई आपसूक वळते. आजच्या तरुणाईला प्रत्येक वेळी नवी फॅशन हवी असते. म्हणून पेशवाई, शाही मस्तानी आणि या वर्षी मयुरपंख पॅटर्नमधील रेडिमेड पितांबर आम्ही तयार केले, असे ‘साडीघर’चे गौतम राऊत यांनी सांगितले. रेडिमेड पितांबर प्रत्येक मापानुसार परफेक्‍ट शिवूनही आम्ही देतो, असे गौतम म्हणाले. पितांबर आणि उपरणे असा पूर्ण सेट मिळतो. यामध्ये चार मीटरचे पितांबर व २ मीटरचे उपरणे यांचा समावेश आहे. या सेटची किंमत ६५० पासून ते ६ हजारापर्यंत आहे. पॉलिकॉट, रॉ सिल्क, आर्टिफिशल सिल्क, बॅंगलोर सिल्क, प्युअर सिल्क या मटेरिअलमध्ये रेडिमेड पितांबर तयार केले जाते. यामध्ये १२ ते ४४ अशी साईज उपलब्ध आहे.

प्युअर सिल्क व बॅंगलोर सिल्कमध्ये पितांबरच्या निऱ्या उठून दिसतात. पेशवाईमध्ये एकाखालोखाल ओचाप्रमाणे झिकझॅक निऱ्याची डिझाईन असते. शाही मस्तानीमध्ये निऱ्यांचे प्रमाण जास्त असून त्याही झिकझॅकमध्ये असतात. मयुपंखमध्ये झिकझॅक डिझाईन; पण मोरपंखाप्रमाणे त्याची डिझाईन तयार केलेली असते. आता तर घरच्या बाप्पालाही पितांबर नेसवण्याचाट्रेंड आला आहे. पूजा व आरती करताना बाप्पाला मॅचिंग पितांबर घरची मुले घालतात. मंजठा, गुलाबी, जांभळा, निळा, लाल, पिवळा, नारंगी या रंगांतील पितांबराला मागणी आहे. पितांबराला कॉन्ट्रास किनार असलेली सोनेरी किंवा चंदेरी रंगांची जरी असल्यामुळे एकदम रिच लूक येतो. उदाहरणार्थ, निळ्या रंगातील पितांबर, त्यावर मोती किंवा पिवळा रंगाचा सदरा, त्यावर उपरणं असा एकदम राजेशाही थाट होऊन जातो. गणपतीच्या मिरवणुकीत फेटा बांधायचा असल्यास पितांबराला मॅचिंग फेटे गिरगाव व दादरमध्ये बनवून मिळतात. वन साईड बटण असलेल्या कुर्त्यांचा ट्रेंड बाजारामध्ये सुरू आहे. या कुर्त्यांवरही पितांबर शोभून दिसेल. लालबाग, दादर आणि गिरगावामध्ये रेडिमेड पितांबर आणि उपरणे आणि सदरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News