३६६ विद्यापीठ परीक्षा घेण्यास तयार : UGC

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020

पाचशे साठ विद्यापीठापैकी एकशे चौऱ्यांनो विद्यापीठांनी यशस्वीरीत्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. त्यातील तीनशे सहासष्ठ विद्यापीठे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन करत आहेत.

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जाहीर केली. एक परीपत्रक काढून देशातील सातशे पंच्चावन्न विद्यापीठांना सुचना दिली. त्यानंतर विद्यापीठांनी परीक्षासंदर्भात केलेली कार्यवाही युजीसीला कळवली आहे. त्यात तीनशे एकवीस विविध राज्यातील विद्यापीठे, दोनशे पंच्चाहत्तर खासजी विद्यापीठ, एकशे वीस स्वातंत्र विद्यापीठ आणि चाळीस केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे. 

पाचशे साठ विद्यापीठापैकी एकशे चौऱ्यांनो विद्यापीठांनी यशस्वीरीत्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. त्यातील तीनशे सहासष्ठ विद्यापीठे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन करत आहेत. तर काही विद्यापीठांची प्रथम बॅच परीक्षा घेण्यासाठी पात्र नाही असे युजीसीला विद्यापीठांनी कळवले आहे. एकुण सातशे पंच्चावन्न विद्यापीठापैकी बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत.     

 

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी पदविका, पदवी, पदव्युत्तर परिक्षा रद्द करण्याचा आदेश काढला. मात्र विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना नाही असे केंद्राने स्पष्ट केले. त्यानंतर राज्य सरकर, युजीसी, केंद्रीय गृह मंत्रालय यांच्यात अधिकारावरुन वादाची ठिणगी पडली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद करण्यात आली. सर्व शाळा, महाविद्यालये नक्की केव्हा सुरु होतील हे सांगणे कठीण आहे. सध्यातरी कोणतीही प्रभावशाली लस कोरोनावर उपलब्ध नाही. त्यामुळे महाविद्यालय सुरु होण्याची चिन्हे दिसत नाही. अशावेळी पदविका, पदवी, पदव्युत्तर परिक्षासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News