रसिका नव्या  वेबसीरिजसाठी सज्ज !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

‘मंटो’, ‘हामिद’ यांसारख्या चित्रपटामधील तिच्या भूमिकेचे चित्रपट समीक्षकांनीही तोडं भरून कौतुक केले. ‘मिर्जापूर’ वेबसीरिजमध्ये तिने साकारलेलं कामुक त्रिपाठीचे पात्र तसेच ‘दिल्ली क्राईम’ या सीरिजमध्ये तिने साकारलेली पोलिस ऑफिसरची भूमिकाही हिट ठरली.

अभिनेत्री रसिका दुग्गलने तिच्या दहा ते बारा वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. शिवाय चित्रपट, वेबसीरिज, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये तिने आपला ठसा उमटवला.

‘मंटो’, ‘हामिद’ यांसारख्या चित्रपटामधील तिच्या भूमिकेचे चित्रपट समीक्षकांनीही तोडं भरून कौतुक केले. ‘मिर्जापूर’ वेबसीरिजमध्ये तिने साकारलेलं कामुक त्रिपाठीचे पात्र तसेच ‘दिल्ली क्राईम’ या सीरिजमध्ये तिने साकारलेली पोलिस ऑफिसरची भूमिकाही हिट ठरली.

आता नव्या वर्षातही एकाच चौकटीमध्ये अडकून न राहता विविध भूमिका आणि प्रयोग करायचे असे रसिकाने ठरवले आहे. ‘मिर्जापूर २’, ‘दिल्ली क्राईम २’ या सीरिजसाठी रसिकाने तयारी सुरू केली आहे. तसेच ‘अ सुटेबल बॉय’ या टीव्ही सीरिजमध्येही तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News