क्रीतीचं ‘मिमी’ या नव्या चित्रपटासाठी सज्ज !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता पंकज त्रिपाठीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

अभिनेत्री क्रीती सेन ‘पानिपत’ या चित्रपटात ‘पार्वतीबाईं’च्या भूमिकेत झळकल्यानंतर आता ती ‘मिमी’ या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी ती तब्बल १५ किलो वजन वाढवणार आहे.

याबाबत क्रीती सांगते, ‘या चित्रपटासाठी १५ किलो वजन वाढवणं माझ्या शरीरासाठी नवीनच असणार आहे. त्यामुळे ते एक आव्हान आहे. कमी वेळात वजन वाढवण्यासाठी मला कॅलरीजचे जास्त सेवन करावे लागणार आहे. माझ्यातील परिवर्तन पाहण्यासाठी मी ही खूपच उत्साही आहे.’

हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता पंकज त्रिपाठीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News