वाचाल तर वाचाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

Hey Dear, 

The more you read, the more things you will know. The more things you learn, the more places you will go. वाचनाबाबतच्या वरील ओळी वाचनाचे महत्त्व दर्शवतात. मागील लेखात सांगितलेली DEAR ची युक्ती तुम्ही वापरत असालच. वाचनाचे प्रकार आपण पाहात आहोत. आणखी काही प्रकार आपण पाहू या. 

         गतीवरून/प्रमाणावरून पडलेले प्रकार-

Hey Dear, 

The more you read, the more things you will know. The more things you learn, the more places you will go. वाचनाबाबतच्या वरील ओळी वाचनाचे महत्त्व दर्शवतात. मागील लेखात सांगितलेली DEAR ची युक्ती तुम्ही वापरत असालच. वाचनाचे प्रकार आपण पाहात आहोत. आणखी काही प्रकार आपण पाहू या. 

         गतीवरून/प्रमाणावरून पडलेले प्रकार-

Extensive reading - या प्रकारचे वाचन भरभर केले जाते. नवीन, अनोळखी शब्दांचे अर्थ अंदाजाने लावून पुढे पुढे वाचन केले जाते. केवळ गाभा, मूळ मुद्दा, विषय इ. समजण्यासाठी या प्रकारचे वाचन केले जाते. करमणुकीसाठी वाचन करणे, कमी वेळेत जास्त माहिती मिळविणे यासाठी सुद्धा या प्रकारचे वाचन केले जाते. गोष्टींची पुस्तके, विनोदी पुस्तके, लहान मुलांची कॉमिक्स यांचे वाचन करताना Extensive Reading केले जाते.

 

Intensive Reading- या प्रकारचे वाचन सावकाश व बारकाईने केले जाते. नवीन शब्दांचे अर्थ अंदाजे न लावता डिक्शनरीचा वापर केला जातो. प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा अर्थ समजून घेऊनच पुढे पुढे वाचन केले जाते. व्याकरणाचा अभ्यास, काळ, शब्दांच्या जाती व त्यांचा उपयोग, प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेत वाचन केले जाते. हे वाचन मर्यादित स्वरूपाचे असते. या प्रकारच्या वाचनास जास्त वेळ लागू शकतो. कधी कधी वाचन पुनःपुन्हा सुद्धा केले जाते. न्यायालयीन व सरकारी दस्तऐवज, GR, नियम, कायदे व न्यायालयीन निकाल, वैद्यकीय अहवाल, विविध प्रकारचे कायदेशीर करार, क्रमिक पुस्तके इ. चे वाचन करताना Intensive Reading केले जाते.

          काय शोधायचे?

Scanning Reading - एखादी अगदी छोट्या स्वरूपाची आणि नेमकी माहिती शोधत असताना या प्रकारचे वाचन केले जाते. उदा. एखाद्या परिच्छेदातून एखादी तारीख, वार, वेळ, ठिकाणाचे नाव, दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी किंवा समानार्थी शब्द शोधणे यासाठी Scanning Reading केले जाते. या प्रकारच्या वाचनात नजर परिच्छेदावरून पटपट फिरते व नेमकी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कधी कधी वाचन होऊनही नेमकी माहिती सांगण्यासाठी पुन्हा या प्रकारचे वाचन केले जाते. बऱ्‍याच वेळा वाचन करत असताना इतर माहिती दुर्लक्षित केली जाते. उदा. हॉटेलमध्ये मेन्यू कार्डमध्ये हवा असलेला पदार्थ, त्याचा दर शोधणे. कोणी दुसऱ्‍या पदार्थाचा दर विचारल्यास त्याच प्रकारचे वाचन करावे लागते. 

 

Skimming Reading - एखाद्या परिच्छेदाचे चांगल्या प्रकारे वाचन झाल्यावर त्याचा गाभा, त्याचा विषय किवा एखाद्या कवितेच्या वाचनानंतर त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना (Theme/Central Idea) इत्यादीसाठी पुन्हा तो घटक वाचनाची गरज पडत नाही. चांगल्या वाचनामुळे आपल्याला त्याचे Gist (सारांश) समजलेलेले असते आणि आणि ते सांगताना पुन्हा पुन्हा वाचावे लागत नाही. या प्रकारच्या वाचनाला Skimming Reading असे म्हटले जाते. उदा. एखाद्या चित्रपटाचा review वाचल्यानंतर तो चित्रपट कौटुंबिक आहे की नाही, असे कोणी विचारल्यावर पुन्हा review वाचण्याची गरज भासत नाही. 

इंग्लिश भाषेतून जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तके वाचाल तेव्हा उद्दिष्ट लक्षात घ्या आणि मगच त्या प्रकारचे वाचन करा.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News