काय म्हणते पल्लवी पाटील नक्की वाचा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 December 2019

ते मला म्हणाले, ‘तुझा चेहरा स्क्रीनसाठी परफेक्‍ट आहे. तू अजून थोडे प्रयत्न कर, तुला नक्कीच चांगली कामे मिळतील.’ त्यांचे हे वाक्‍य ऐकल्यावर मला खूप बरे वाटले. या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर अपयशही येऊ शकते, हे माहीत होते. मात्र, एकदा प्रयत्न करून बघू, असे ठरवून मी नोकरी सोडली आणि‌ या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. 

लहानपणापासून मला कला क्षेत्राची आवड होती; मात्र चित्रपट क्षेत्राबाबत मार्गदर्शन करायला कोणीच नव्हते. मी मूळची जळगाव जिल्ह्यातील आहे. मात्र, माझे आर्किटेक्‍चरचे शिक्षण पुण्यातील डी. वाय. पाटील महाविद्यालयात झाले. त्यानंतर काही महिने मी नोकरी केली. त्या दरम्यान ‘महाराष्ट्राची श्रावण क्वीन’ या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक सतीश राजवाडे यांनी मला प्रोत्साहन दिले. ते मला म्हणाले, ‘तुझा चेहरा स्क्रीनसाठी परफेक्‍ट आहे.

लहानपणापासून मला कला क्षेत्राची आवड होती; मात्र चित्रपट क्षेत्राबाबत मार्गदर्शन करायला कोणीच नव्हते. मी मूळची जळगाव जिल्ह्यातील आहे. मात्र, माझे आर्किटेक्‍चरचे शिक्षण पुण्यातील डी. वाय. पाटील महाविद्यालयात झाले. त्यानंतर काही महिने मी नोकरी केली. त्या दरम्यान ‘महाराष्ट्राची श्रावण क्वीन’ या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक सतीश राजवाडे यांनी मला प्रोत्साहन दिले.

ते मला म्हणाले, ‘तुझा चेहरा स्क्रीनसाठी परफेक्‍ट आहे. तू अजून थोडे प्रयत्न कर, तुला नक्कीच चांगली कामे मिळतील.’ त्यांचे हे वाक्‍य ऐकल्यावर मला खूप बरे वाटले. या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर अपयशही येऊ शकते, हे माहीत होते. मात्र, एकदा प्रयत्न करून बघू, असे ठरवून मी नोकरी सोडली आणि‌ या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. 

नोकरी सोडल्यानंतर योगेश सोमण यांच्याकडे एक वर्कशॉप केला. त्या वर्कशॉपदरम्यान मला ‘नाईन एक्स झकास हिरोइन’ या रिॲलिटी शोमधून दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या ‘क्‍लासमेट्‌स’ या चित्रपटासाठी माझी निवड झाली.

‘क्‍लासमेट्‌स’मध्ये मी ‘हीना’ची भूमिका साकारली आहे. या माझ्या पहिल्या चित्रपटाचा अनुभव खूप भारी होता. या चित्रपटानंतर ‘७०२ दीक्षित’, ‘सेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉईज २’, ‘तू तिथे असावे’, ‘ट्रिपल सीट’ आदी चित्रपटांमध्ये मी काम केले. माझे ‘बस्ता’, ‘ग्रे’, ‘चक्रव्यूह’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

आदित्य सरपोतदार यांच्यासोबत पुन्हा काम करायला मला नक्कीच आवडेल. नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचीही माझी इच्छा आहे. अभिनय क्षेत्रात येण्याची अनेकांची इच्छा असते, परंतु अपयशाच्या भीतीने ते टाळतात. अशांनी जिद्दीने प्रयत्न करून पाहावेत, असे मला वाटते. कदाचित त्यातून यश मिळेल किंवा आपण प्रयत्न केले, याचे समाधान मिळेल. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News