फिरायला जाताना गाडी नेताय? हे वाचा

प्रशांत शिंदे, सहायक वाहन निरीक्षक 
Thursday, 28 February 2019

ड्रायव्हिंग हा एक विशेषाधिकार असून तो हक्क नाही. या अधिकारान्वये १८ वर्षांवरील व्यक्ती भारतामध्ये कुठेही वाहन चालवू शकते. मात्र हे वाहन सुरक्षितपणे चालवणे आवश्‍यक आहे.

मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये; तसेच त्याअनुषंगाने बनलेल्या केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुरक्षितपणे वाहन चालवण्यासंबंधी आदर्श प्रणाली पुढीलप्रमाणे अंगिकारावी असे स्पष्ट केले आहे. प्रत्येक चालकाने खालील गोष्टींचे पालन करणे आवश्‍यक आहे. 

  • काळजी तसेच रस्ता वापरणाऱ्या इतर सर्व घटकांबद्दल जागरूकता असावी. 
  • रस्त्यावरील चिन्हे, वाहतुकीचे नियम, अटी याची माहिती असावी. 
  • अवैध गोष्टींविषयी सावधगिरी बाळगणे.
  • दुसऱ्या चालकांच्या चुकीच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीविषयी माहिती घेणे.
  • तसेच अपघात होऊच नये याची काळजी घेणे आणि अपघात घडल्यास अपघातग्रस्तास तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे.

    वाहन चालवणाऱ्या चालकांवर काही जबाबदाऱ्याही असतात. या चालकांनी रस्त्यावर वाहन चालवताना रस्ता सुरक्षिततेसंबंधी नियम आणि अटी पाळणे बंधनकारक असून वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्‍यक आहे.

    सदर कागदपत्रे ट्रॅफिक पोलिस; तसेच आर.टी.ओ. अधिकारी मागतील, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. चालकाचा परवाना (लायसन्स), वाहनाचे नोंदणीपत्र, करपत्र, विमापत्र, परमिट आणि पीयूसी ही कागदपत्रे दाखवून वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News