वाचा! अमेझॉनच्या आगीमुळे भारताला फरक पडतो

फिरस्ती
Monday, 26 August 2019

'ब्राझीलमधील अॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागली आहे'. ही बातमी भारतात अगदी मोजक्या लोकांनीच वाचली असेल किंवा पाहीली असेल आणि ऊरलेल्या काही लोकांना तर याबद्दल अजुन माहीतीही नाही. कारण या बातमीला तेवढ मिडीया कव्हरेज नाही. जवळपास तीन आठवड्यांपासुन जगातलं सर्वात मोठ जंगल 'अॅमेझॉन' हे जळत आहे. 

'ब्राझीलमधील अॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागली आहे'. ही बातमी भारतात अगदी मोजक्या लोकांनीच वाचली असेल किंवा पाहीली असेल आणि ऊरलेल्या काही लोकांना तर याबद्दल अजुन माहीतीही नाही. कारण या बातमीला तेवढ मिडीया कव्हरेज नाही. जवळपास तीन आठवड्यांपासुन जगातलं सर्वात मोठ जंगल 'अॅमेझॉन' हे जळत आहे. 

सोशल मिडीयावरील #PrayForAmazon या हॅशटॅग ट्रेंडमुळे ही घटना भारतीयांपर्यंत आत्ता कुठे हळूहळू पोहचत आहे. एखाद्या जंगलाला यापूर्वी कधीच नैसर्गिक आग लागली नाही का? जंगलात वणवे लागुन आग लागत असते त्यात एवढ काय? अॅमेझॉन जंगल भारतापासून खुप दूर आहे, आपला काय संबंध? आपल्याला काय फरक पडतोय असे अनेक प्रश्न आणि विचार भारतीयांच्या मनात आले असतील.  

अॅमेझॉनला जंगलाला लागलेली आग हा सर्वांपेक्षा मोठा असण्याचं कारण हे की पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोत नष्ट होत चालला आहे. Amazon rainforest ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था (ecosystem) आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मिळ प्रजाती फक्त अॅमेझॉनमध्ये आढळतात ज्या जगात इतर कुठेही आढळत नाहीत; पण आपल्याला त्याचं काय! ती झाडं, ते कोण कधी न पाहीलेले, अभ्यासलेले प्राणी, त्यांचं कसलं दुःख करायचं! आपल्या फायद्याचं बोलू, म्हणजे नुकसानाबद्दल बोलू. जगात असलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी २०% ऑक्सिजन या जंगलातून निर्माण होतो. या जंगलाला आपल्या ग्रहाची फुफ्फुस म्हणून ओळखलं जातं. आता यापुढे ऑक्सिजनची ही निर्मिती चिंताजनक पद्धतीने मंदावणार आहे. त्यात वरून तीन आठवडे सातत्याने ज्वलन होताना आधीच किती ऑक्सिजन खर्ची पडला असेल आणि किती प्रचंड प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात मिसळला असेल याची कल्पनादेखील भयावह आहे. 

परवा या जंगलापासून हजारो मैल दूर असणाऱ्या साओ पॉओलो शहरावर भर दुपारी काळेकुट्ट ढग दाटून आले होते, धूर अन राखेचे आणि हा सिलसिला अजून सुरुच आहे. वणवा तर अजूनही विझलेला नाहीच. आपण आधीच ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यात असताना ही घटना हे विनाशाच्या दिशेने हे फार मोठं पाऊल आहे आणि आपण याबद्दल काय करु शकतो? वरवर पाहता काहीच नाही! आपण ब्राझीलला जाऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न नाही करु शकत; पण किमान यापुढे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर पर्यावरणाचं संवर्धन नाही तर किमान नुकसान तरी घडणार नाही याकरता कसून प्रयत्न करु शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News