रयत सेवक हाच संस्थेचा मानबिंदू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थेने ऑनलाईन माध्यमातून  शिक्षण पद्धतीत देखील उत्तुंग भरारी घेतली आहे.

हडपसर : रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था असून शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभ म्हणून काम करत आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थेने ऑनलाईन माध्यमातून  शिक्षण पद्धतीत देखील उत्तुंग भरारी घेतली आहे.रयत सेवकांमुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यामुळे रयत सेवक हाच खऱ्या अर्थाने संस्थेचा मानबिंदू ठरत आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, सहशिक्षक अरूण देवळेकर,व प्राध्यापिका तेजस्विता जगताप ही सर्व मंडळी आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या  प्रसंगी शुभेच्छा देताना विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी बोलत होते. 

सेवानिवृत्त झालेल्या या तीनही सेवकांनी विद्यालयासाठी आणि संस्थेसाठी मोलाचे योगदान दिले. या प्रसंगी सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना संस्थेच्या वतीने चांदीचे नाणे, रयत बँकेच्या वतीने कर्मवीर अण्णांची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे आणि विद्यालयाच्या वतीने संपूर्ण पोषाख देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर यांनी मानले तर सूत्रसंचालन रूपाली सोनावळे यांनी केले..

या सोहळाच्या प्रसंगी साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व संस्थेचे आजीव सेवक विजय शितोळे, साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, रयत बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे,  शाखाधिकारी बडवे साहेब,विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते  सत्कारमूर्तींचे कुटुंबिय -नातेवाईक, शाखेतील निवडक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News