चॅलेंजर पुरस्काराचा मानकरी ठरला रवींद्र पाडवी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020
  • मुंबईत २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते.

अकोला -  मुंबईत २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणारा अकोला क्रीडा प्रबोधिनिचा बॉक्सर रवींद्र पाडवी बेस्ट चॅलेंजर पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत महिला गटात अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या जानवी निमकडेने रौप्यपदक पटकाविले.

महाराष्ट्र राज्य कॅडेट चॅम्पियन असलेल्या रवींद्रने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही अकोला क्रीडा प्रबोधिनीचे नावा उज्‍ज्वल केले आहे. त्याने मुंबईतील स्पर्धेत बेस्ट चॅलेंजर पुरस्कार मिळवून विदर्भ संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. याच स्पर्धेत विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणारी अकोला क्रीडा प्रबोधिनीची बॉक्सर जानवी निमकडेने ६० किलो वजन गटात 

रौप्यपदकावर पंच मारला. दोन्ही बॉक्सर अकोला येथील वसंत देसाई क्रीडांगणावर राज्य क्रीडा मार्गदर्शक सतिशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. मुंबईतील स्पर्धेत विदर्भ संघाचे प्रशिक्षक रेल्वे विभागातील अजय जाखाल होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News