रव्याची इडली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020
  • साहित्य :

तांदळाची इडली तुम्ही नेहमी खातात पण आज जरा वेगळी आपण इडलीची रेसिपी घेऊन आली आहे. ही रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली ती म्हणजे ‘रव्याची इडली’ मग करून नक्की बघा ही रेसिपी तुम्हाला आवडेल. 

साहित्य :-

• एक वाटी उडीद डाळ
• दोन वाट्या इडली रवा
• अर्धा चमचा मेथी दाणे 
• चवीला मीठ

कृती :-

डाळ आणि रवा धुऊन वेगवेगळे भिजत घालावे. दोन्हीत थोडे थोडे मेथी दाणे घालावे. उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटावी. डाळ वाटून होत आली की, पाणी निथळून रवा घालून वाटावी. 

त्यात मीठ घालून लागेल तसं पाणी घालून मोठ्या पातेल्यात झाकून उबेच्या जागी रात्रभर जवळजवळ अडीचपट फुगेपर्यंत ठेवा. सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवा. 

इडली पात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावून प्रत्येकात डावानं अर्धी वाटी भरेल एवढं पीठ घाला. पातलेल्यातलं पीठ अजिबात न ढवळता, कडेकडेनं पीठ काढा. म्हणजे फुग मोडणार नाही. सात-आठ मिनिटात इडल्या उकडून होतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News