रतनगड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020
  • १७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते.
  • १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते.

१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची आणि सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरूश्रोशी परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.

पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले आणि नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले त्याच पंत्त्की मध्ये राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठिकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले आणि त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदीमध्ये रूपांतर झाले आणि नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News