रतन टाटांना सुद्धा झालं होतं प्रेम; चार वेळा लग्न करता करता राहिले !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020

अमेरिकेत शिकत असतानाच  ते एका मुलीच्या प्रेमात पडले. दोघांचे खूप परिपक्व नाते होते आणि दोघे लग्नासाठी तयार होते, पण त्या मुलीला भारतात येण्याची इच्छा नव्हती.

रतन नवल टाटा. पूर्ण नाव वालिद नवल टाटा. जन्म 28 डिसेंबर 1937. एक माणूस ज्याने आयुष्यभर फक्त व्यवसाय केला. दुसरे काहीच नाही. त्यांनी निर्णय घेतला आणि मग ते सिद्ध करून दाखवले. ते त्याच्या आग्रहाने, उत्कटतेने आणि जिद्दीने. रतन टाटा यांचा जन्म धनाढ्य परिवारात झाला. मात्र त्यांना त्यांच्या बालपणी खुप त्रास सहन करावा लागला. रतन टाटा लहान असताना त्यांचे वडिल नवल टाटा आणि आई सून्नी टाटा काडीमोड झाला. रतन टाटा यांना त्यांच्या आजीने सांभाळलं.

रतन टाटा यांनी लग्न केले नाही. त्यांनी आयुष्यभर फक्त काम केले आणि अजूनही करत आहे. जरी त्यांना आपल्या लव्ह लाइफबद्दल बोलणे आवडत नाही, परंतु काही प्रसंगी त्यांनी आपल्या जीवनाचे  पैलू सामायिक केले आहेत. सीएनएन इंटरनॅशनला दिलेल्या मुलाखतीत त्यानी सांगितले की, अमेरिकेत शिकत असतानाच  ते एका मुलीच्या प्रेमात पडले. दोघांचे खूप परिपक्व नाते होते आणि दोघे लग्नासाठी तयार होते, पण त्या मुलीला भारतात येण्याची इच्छा नव्हती.

त्याच वेळी भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले. त्यावेळी परिस्थिती पाहून रतन टाट यांची मैत्रीण खूप घाबरली होती. दुसरीकडे, रतन टाटा यांच्या आजींची तब्येत भारतात बिघडली होती, ज्यामुळे त्यांना भारतात परत यावं लागलं. रतन टाटा भारतात परत आले, पण त्यांची मैत्रीण आली नाही. काही दिवसांनंतर मैत्रीणिनं अमेरिकेत दुसऱ्या कुणाशी लग्न केले. त्या मुलाखतीत रतन टाटा यांनी कबूल केले की त्याचे लग्न जवळजवळ चार वेळा होता होता राहिले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News