रशीद खानचा नवा विश्‍व विक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020
  • कॅरेबियन प्रीमिअर लीग (सीपीएल) मधील फिरकीपटू रशीद खानने ट्‌वेंटी-२० क्रिकेटस्पर्धेत विश्‍वविक्रमाची नोंद केली आहे.
  • अफगाणिस्तानचा हा फिरकीपटू सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडंट्‌स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

नवी दिल्ली :- कॅरेबियन प्रीमिअर लीग (सीपीएल) मधील फिरकीपटू रशीद खानने ट्‌वेंटी-२० क्रिकेटस्पर्धेत विश्‍वविक्रमाची नोंद केली आहे. अफगाणिस्तानचा हा फिरकीपटू सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडंट्‌स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने सेंट ल्युसीआ झौक्‍सच्या नबीला बाद करत विकेट्‌सचा टप्पा पूर्ण केला. ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये २१३ सामन्यांत ३०० विकेट्‌स घेणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. त्याने २१ वर्ष आणि ३३५ दिवसांनी हा विक्रम केला आहे. गुरुवारी सेंट ल्युसीआ झौक्‍स यांच्याविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. शिवाय पावसाच्या व्यत्ययामुळे झौक्‍ससमोर ४ षटकांत ४७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते आणि त्यांनी ७ विकेट्‌स राखून हा सामना जिंकला आहे. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये रशीद सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो. यंदा इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल २०२०) संयुक्त अरब अमिराती येथे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News