कोरोनाच्या जलद आणि अचूक निदानासाठी 'या' चाचण्यांवर भर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 5 July 2020
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) घेतला निर्णय 

मुंबई : देशभरातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असला, तरी कोव्हिड- 19 विषाणूचा प्रसार मात्र वाढतच आहे. त्यामुळे पावसाळ्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे चाचणीची क्षमता जास्तीत जास्त वाढवण्याचा निर्णय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) घेतला आहे.

कोरोनाच्या निदानासाठी मुख्यत्वे आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. या चाचणीवर उपलब्धतेच्या मर्यादा आहेत. त्यामुळे विश्‍वसनीय आणि सोयीस्कर जलद निदान करणारे उपकरण विकसित करणे आवश्‍यक आहे. अशा उपकरणाचा वापर सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांत केला जाऊ शकेल, यासाठी आयसीएमआर प्रयत्नशील आहे.

आयसीएमआरने कोरोनाच्या जलद आणि अचूक निदानासाठी रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आयसीएमआरने एसडी बायोसेन्सर कंपनीला रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन किट बनवण्यास परवानगी दिली आहे. केवळ एक कंपनी हे काम करू शकणार नसल्याने अशी चाचणी विकसित केलेल्या सर्व संस्थांना आमंत्रित केले आहे.
या संस्थांचे सहकार्य

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (दिल्ली), एसएमएस मेडिकल कॉलेज (जयपूर), किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (लखनऊ), कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इन्फेक्‍शन डिसीजेस (मुंबई), पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (चंडीगड), जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (पुदुच्चेरी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (केरळ), बंगलोर मेडिकल कॉलेज ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (बेंगळूरु), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍण्ड न्यूरोसायन्स (बेंगळूरु)

प्रमाणीकरणासाठी निकष

  • - किमान 300 जलद चाचण्या व अत्याधुनिक साधने आवश्‍यक.
  • - सहभागी तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News