कोरोना रूग्णालयात तरूणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020
  • कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, कोरोनाची अनेक देशांनी धास्ती घेतली आहे, त्याचबरोबर भारतातही रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
  • महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे अधिक रग्ण आहेत.

दिल्ली - कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, कोरोनाची अनेक देशांनी धास्ती घेतली आहे, त्याचबरोबर भारतातही रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे अधिक रग्ण आहेत. दोन्ही राज्यांनी कोरोनावरती मात करण्यासाठी मागील ४ महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यातचं कोरोनावर उपचार घेणा-या एका तरूणीवर बलात्कातकूर झाल्याची घटना उघडकीस आली आहे. झालेल्या प्रकारचा व्हिडिओ सुध्दा तयार करण्यात आला असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार तरूणीला कोरोनाची लागण झाल्याने निदान झाल्यानंतर तरूणीने कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं. आरोपीला सुध्दा कोरोनाची लागण झाल्याने त्याला सु्ध्दा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. १५ जुलैच्या दिवशी आरोपीने तरूणीवर बाथरूममध्ये अत्याचार केला. तसेच अत्याचार करत असताना सुध्दा व्हिडीओ तयार केला आहे.
 
इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या अंतर्गत हे कोविड सेंटर येत असून माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर रेकोर्ड केलेले व्हिडीओ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दोन्ही आरोपीना ताब्यात घेतलं असून कोरोना बरा होईपर्यंत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दोघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. सध्या दोन्ही आरोपींना एम्समध्ये रूग्णालयात आहेत. पुरूष व महिलांसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह असताना हा प्रकार घडल्याने पोलिस सुध्दा गोंधळात आहेत. या प्रकरणाची दिल्ली पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News