रणवीर पुन्हा एकदा रमला जुन्या आठवणीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

पुन्हा एकदा रणवीरने १९८३ च्या विश्‍वकप स्पर्धेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘८३’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील सर्व भूमिकांचे पोस्टर्स एक एक करून प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे आणि त्यामधून पुन्हा एकदा रणवीरने १९८३ च्या विश्‍वकप स्पर्धेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या पोस्टरमध्ये तो विश्‍वकप उंचावताना दिसत आहे आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून येत आहेत. हा तोच क्षण ज्या वेळी १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदाच विश्‍वकप जिंकल्यानंतर कपिल देव यांनी अशाच प्रकारे ही ट्रॉफी उंचावली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News