फुटपाथवर अभ्यास करुन दहावीत प्रथम क्रमांक; महानगरपालिकेने दिले वन बीएचके बक्षीस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

मध्ये प्रदेशातील इंदौर शहरात राहण्याऱ्या तरुणीने मिळवलेल्या यशबद्दल सर्व स्तरातून कौतूक होत आहे. तरुणीच्या जिद्दीची कहानी अनेकांना प्रेरणा देत आहे.

मनात जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. घरची प्रतिकूल परिस्थिती, त्यामुळे राहायला घर नाही, फुटपाथवर राहून तरुणीने कठोर अभ्यास केला आणि चक्क दहावीत प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल तरुणीला पारितोषिक म्हणून इंदौर महानगरपालिकेने वन बीएचके सदनिका दिली. मध्ये प्रदेशातील इंदौर शहरात राहण्याऱ्या तरुणीने मिळवलेल्या यशबद्दल सर्व स्तरातून कौतूक होत आहे. तरुणीच्या जिद्दीची कहानी अनेकांना प्रेरणा देत आहे.

'आई- वडील मोल मजूरी करुन कुटुंबाचा गाडा चालवत असल्यामुळे घर घेणे शक्य नव्हते, त्यामुळे फुटपाथचा आधार मिळाला. पुटपाथवर राहून माझा जन्म झाला. आणि फटपाथवरच अभ्यास केला. घरती परिस्थिती प्रतिकूल असली तरी आई- वडीलांनी शिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. शाळेत कधी खंड पडू दिला नाही. अभ्यास करताना कोणताही व्यत्यय येऊ दिला नाही. अतिषय कठीण परिस्थितीमध्ये पालकांनी साथ दिली, त्यामुळे मी यश प्राप्त करु शकले, माझ्या यशाचे सर्व श्रेय आई- वडीलांना देते' अशी भावना दहावीत ६८ टक्के मिळवलेल्या भारती खांडेकर या विद्यार्थिनीने व्यक्त केली. भारतीला भविष्यात कलेक्टर बनण्याची इच्छा आहे त्यासाठी आर्थिक पाठबळाजी गरज आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News