तो समृध्द आणि विशालसा रंकाळा तलाव...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील सरोवर आहे. पूर्वीच्या काळी येथे एक मोठी पथ्थराची खण होती इ.स. ८०० ते ९०० च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला. तळयाकाठी शालिनी राजवाडा असून राजवाडयाच्या भव्यतेमुळे रंकाळयाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.

रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील सरोवर आहे. पूर्वीच्या काळी येथे एक मोठी पथ्थराची खण होती इ.स. ८०० ते ९०० च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला. तळयाकाठी शालिनी राजवाडा असून राजवाडयाच्या भव्यतेमुळे रंकाळयाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.

पूर्व बाजूला आणि थोडयाफार अंशी खुद्द तळयामध्ये संध्यामठ आहे हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून त्याची बांधणी हेमांडपंथी पद्धतीने केली आहे. मठाची वास्तू हल्ली सुस्थितीत नाही पावसाळयामध्ये तलाव जेव्हा भरून वहातो तेव्हा संध्यामठ पूर्णपणे पाण्यात बुडतो रंकाळयाजवळ पद्‌माराजे उद्यान आहे पूर्वीच्या काळी कोल्हापूरच्या राजांना तलावामध्ये विहार करणे सुलभ व्हावे म्हणून छोटया छोटया नावांची व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे या तलावा मध्ये मासे पकडण्याचा हक्‍क फक्‍त राजांचा होता आता तलावात विहार करण्यासाठी महानगरपालिकेने सोय केली आहे तळ्याला रंकाळा हे नाव रंक भैरव या देवाच्या नावावरून देण्यात आलेले आहे...

रंक भैरव महालक्ष्मीच्या अतिशय मर्जीतला होता असे म्हणतात रंकाळा तलावाची सुरूवात त्याजागी दगडाची एक खाण खणण्यापासून झाली. जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य याने जी ३६० जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली हल्ली या तळयाला उत्तरेकडे असलेल्या दोन ओढ्यातून पाण्याचा पुरवठा होतो...

१८८३ पासून रंकाळा तलावाच्या पाणीपुरवठयात बरीच सुधारणा झाली शहराच्या दिशेने जो जुना बंधारा होता त्यापेक्षाही अधिक मजबूत बंधरा नव्याने बांधण्यात आला हा बंधारा अजूनही चांगल्या स्थितीत आहे परंतु त्याला लागून असलेल्या रस्त्यावर वारंवार भर टाकली गेल्यामुळे बंधाऱ्याची उंची तुलनेने कमी झाल्यासारखी वाटते.. रंकाळा ही कोल्हापूरच्या प्राचीन सहा वसाहतीपैंकी एक असून तेथे वर नमूद केलेला संध्यामठ तसेच एक नंदीची मोठी मूर्ती असलेले देवालय आहे ब्रह्मपूरीशी संबंध नसलेले रंकाळा हे त्यावेळी एक स्वतंत्र खेडे होते...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News