छोट्या पडद्यावर लक्ष्मीबाईंच्या रूपात ही अभिनेत्री 

यिनबझ ऑनलाईन टीम
Friday, 15 February 2019

राणी लक्ष्मीबाईंची यशोगाथा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिलीच. आता मालिकेच्या माध्यमातून तिचा संपूर्ण इतिहास प्रेक्षकांसमोर येणार आहे. हिंदी कलर्स वाहिनीवर ‘खूब लडी मर्दानी झांसी की रानी’ ही मालिका सुरू झाली आहे.

या मालिकेत झांसीच्या राणीची भूमिका साकारण्याची जबाबदारी अभिनेत्री अनुष्का सेनच्या खांद्यावर आहे. अनुष्का म्हणते, ‘झांसीच्या राणीची भूमिका छोट्या पडद्यावर साकारायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे.

शिवाय माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे. या मालिकेत मणिकर्णिकेचे दोन वेगवेगळे अवतार पाहायला मिळणार आहेत. मी पहिल्यांदाच एखादी मुख्य भूमिका साकारली आहे.’

अनुष्काबरोबरच विकास मनक्तला, राजेश शृंगारपुरे, विजय कश्‍यप, अंशुल त्रिवेदी, अनुजा साठ्ये यांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या रूपातील अनुष्काला प्रेक्षकांची पसंती मिळते का? हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News