मुंबई विद्यापीठात रंगला 'उत्सव मायमराठीचा'  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

मुंबई विद्यापीठ मराठी विभागाच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदादेखील मराठी भाषा दिनानिमित्त बुधवारी (ता. २६) ‘अभिव्यक्ती उत्सव आपल्या मायमराठीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवडी : मुंबई विद्यापीठ मराठी विभागाच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदादेखील मराठी भाषा दिनानिमित्त बुधवारी (ता. २६) ‘अभिव्यक्ती उत्सव आपल्या मायमराठीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत कविताचित्र, निबंध, काव्यवाचन, वक्तृत्व, पथनाट्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भरत पाटणकर, मराठी विभागप्रमुख डॉ. अनिल सकपाळ, कवयित्री छाया कोरगावकर उपस्थित होत्या. विद्यापीठाच्या ‘अभिव्यक्ती उत्सव आपल्या मायमराठीचा’ या उत्सवात रुईया, रुपारेल, रत्नम, साठे, सोमय्या, एल्फिन्स्टन, बेडेकर, एम. डी. आदी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. पथनाट्य स्पर्धेमध्ये के. जे. सोमय्या व रत्नम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीप्रथम क्रमांक पटकला.

बक्षीस वितरणावेळी परीक्षकांनी स्पर्धकांच्या त्रुटी व चांगले गुण अशा अनेक गोष्टींचा उलगडा केला. या वेळी डॉ. वंदना महाजन, डॉ. अलका मटकर, डॉ. सुनील अवचार, डॉ. प्रवीण डाळिंबकर, चित्रकार डॉ. प्रकाश भिसे, संदीप कदम, विनोद कुंब्रे, डॉ. संतोष राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शामल गरुडकर यांनी केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News