मायणी विद्यालयात रंगलाय पक्षी निरीक्षणाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

संकेत नाईक यांनी पक्षी निरीक्षण कसे करणे, त्यांची ओळख करून घेण्याची पद्धत, दुर्बिण वापरण्याची कला आदीची माहिती दिली.

गोवा  : मायणी - न्हावेली येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात ‘जावे पक्ष्यांच्या गावा'' हा पक्षी निरीक्षणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केरी सत्तरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौज व सरकारी प्राथमिक विद्यालय मायणी यांच्या विद्यमानाने हा उपक्रम झाला. 

या उपक्रमात पर्यावरण अभ्यासक व शिक्षक संकेत नाईक यांनी पक्षी निरीक्षणावर मार्गदर्शन केले. यावेळी संकेत नाईक यांनी पक्षी निरीक्षण कसे करणे, त्यांची ओळख करून घेण्याची पद्धत, दुर्बिण वापरण्याची कला आदीची माहिती दिली. तसेच गोव्यात आढळणारे पक्षी आणि त्यांची वैशिष्ट्य याची माहिती दृकश्राव्‍य (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) सादरीकरणाद्वारे दिली. तद्‍नंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गावातील विविध ठिकाणी नेऊन प्रत्यक्ष पक्षी निरीक्षण केले व त्यावेळी पक्ष्यांची माहिती दिली.

यावेळी बोलताना संकेत नाईक यांनी सांगितले की, पक्षी निरीक्षणातून पक्षांबद्दल आवड निर्माण करावी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी कार्य करावे. पक्षी हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक असून पक्षी वाचले तर निसर्ग वाचेल व त्याचा समतोल राहील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News