राधे’साठी रणदीपचा खटाटोप 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 March 2020

या चित्रपटात मी नकारात्मक भूमिका साकारत असलो, तरी ॲक्‍शन सीन्ससाठी मला अथक परिश्रम करावे लागले, असे रणदीप सांगतो. तो म्हणतो, ‘मला या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना बरीच मेहनत करावी लागली.

अभिनेता रणदीप हुड्डाची शरीरयष्टी; तसेच त्याच्या स्टाईलचे लाखो दिवाने आहेत. सलमान खानबरोबर त्याने ‘किक’, ‘सुलतान’सारखे हिंदी चित्रपट केले. आता पुन्हा एकदा सलमानच्या आग्रहाखातर त्याने ‘राधे’ चित्रपटासाठी होकार दिला.

या चित्रपटात मी नकारात्मक भूमिका साकारत असलो, तरी ॲक्‍शन सीन्ससाठी मला अथक परिश्रम करावे लागले, असे रणदीप सांगतो. तो म्हणतो, ‘मला या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना बरीच मेहनत करावी लागली. सलमानबरोबर एक ॲक्‍शन सीन करत असताना मला अठरा टेक द्यावे लागले. त्याचदरम्यान माझ्या पायाला दुखापतही झाली.’ रणदीपने या चित्रपटासाठी केलेला खटाटोप यशस्वी ठरणार का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News