रणबीरने दिला चित्रपटसाठी नकार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

साऊथमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम करण्यास रणबीरही उत्सुक होता. मात्र, आता या चित्रपटामधून त्याचा पत्ता कट झाला आहे. आता या चित्रपटात रणबीर नव्हे, तर प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

येत्या वर्षात रणबीर कपूरचे जवळपास दोन ते तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच त्याने दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीचा आगामी ‘डेविल’ हा चित्रपट साईन केला होता. साऊथमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम करण्यास रणबीरही उत्सुक होता.

मात्र, आता या चित्रपटामधून त्याचा पत्ता कट झाला आहे. आता या चित्रपटात रणबीर नव्हे, तर प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रणबीरने स्वतःच हा चित्रपट करण्यास नकार दिला असल्याचीही चर्चा आहे. म्हणूनच प्रभासचे बॉलीवूडमधील वाढते प्रस्थ पाहता संदीप यांनी त्याला या चित्रपटामध्ये कास्ट करण्याचे ठरविले आहे.

संदीपसारख्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची रणबीरला संधी होती. मात्र, आता त्याने ‘डेविल’साठी काही कारणास्तव नकारार्थी मान हलवली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News