नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाच साज ...

- सुजल कदम
Monday, 3 August 2020
  • नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यातला महत्वाचा सण . दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करायचा आणि वर्षभर भरपूर मासळी मिळण्यासाठी प्रार्थना करायची.

नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यातला महत्वाचा सण . दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करायचा आणि वर्षभर भरपूर मासळी मिळण्यासाठी प्रार्थना करायची. पारंपरिक गोडधोड पदार्थ , नाच गाण्याचा जल्लोष आणि अनोख्या स्पर्धांचा कोळीवाड्यात माहोल असतो. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजनन क्रियेचा असतो म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.या वर्षीची परिस्थती पाहता प्रत्येक सण व उत्सव हे कोरोनाच्या सावटाखाली सापडले गेले आहेत. 

भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अतिशय महत्व आहे पण यावेळी या कोळीबांधवानी आपली परंपरा जपताना सामाजिक भान राखणे ही महत्वाचे आहे. या सागराने आपल्याला भरपूर काही दिले त्याच्याकडे हात जोडून हीच प्रार्थना करू कि सागरा कोरोनारूपी पसरलेलं हे विष समस्त जगातून नष्ट कर आणि आभाळातून अमृताच्या सरी आम्हा सर्वांवर बरसू दे.

या महाभयंकर रोगाने सर्व लोकांची व देशाची परिस्थिती ढासळली आहे अशा परिस्थतीत जमेल त्या पद्धतीने नियमांचे पालन करून आपण सण व उत्सव साजरे करू आणि आपली परंपरा जपू व देशाचे हित सुद्धा जपू.

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते. पुरातन काळात जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षित जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला सदैव तिचे रक्षण करेल असे वचन देतो आणि ते वचन निभावण्यासाठी राखीचा तो पवित्र धागा भावाला हिंमत देतो. सध्याच्या काळात रक्षाबंधन साठी वेगवेगळ्या रंगीबेरंगी आकर्षक राख्या भावासाठी घेतात व भाऊ देखील आपल्या बहिणीला आकर्षक भेटवस्तू देऊन या दिवसाची शोभा वाढवतो.

लॉकडाऊनमुळे यंदा भाऊ- बहीण एकत्र येऊ शकत नाहीत परंतु ऑनलाईन राखी व भेटवस्तू पाठवून एका नव्या पद्धतीने परंपरा नक्कीच कायम ठेवणाच्या प्रयत्न आपण सर्वजण उत्साहाने करू शकतो . 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News