भावांच बहिणीला रक्षाबंधन गिफ्ट; UPSC परीक्षेत देशात चौथी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • युपीएससी परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे डोक शांत ठेवून मन लावून अभ्यास करणे. अभ्यासा मन संपूर्णपणे एकाग्रह करणे गरजेचे असते.
  • असा अभ्यास केला तर फक्त ४ ते ५ तासांचा अभ्यास देखील पुरेसा असतो आणि त्यातूनही यश मिळवता येत हे वाराणसीच्या अर्तिका शुल्कानं सिद्ध करून दाखवल आहे.

युपीएससी परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे डोक शांत ठेवून मन लावून अभ्यास करणे. अभ्यासा मन संपूर्णपणे एकाग्रह करणे गरजेचे असते. असा अभ्यास केला तर फक्त ४ ते ५ तासांचा अभ्यास देखील पुरेसा असतो आणि त्यातूनही यश मिळवता येत हे वाराणसीच्या अर्तिका शुल्कानं सिद्ध करून दाखवल आहे. दोन्ही भाऊ युपीएससी देऊन वेगवेगळ्या पदावर आहेत आणि वडील डॉक्टर असल्याने घरातूनच युपीएससीच्या परीक्षचे तिला योग्या ते मार्गदर्शन मिळाले. अर्तिकाचे शालेय देखील शिक्षण वाराणसीत झाले. पहिल्यापासूनच शाळेत पहिल्या नंबरात असणाऱ्या अर्तिकाला हाती घेतलेले काम अत्यंत कुशल आणि हुशारीने पूर्ण करण्याची सवय होती.

अर्तिकाने कोचिंग क्लास देखील लावला नव्हता पण तिने तिच्या दोन्ही भावांच्या मदतीने या परीक्षेची तयारी केली होती. अर्तिकाने दोन्ही भावांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ च्या युपीएससी परीक्षेत तिने देशात चौथा क्रमांक मिळवला. १२ महिन्यांच्या तयारीत अर्तिकाने हे यश कसं मिळवल जाणू घेऊया.

अर्तिकाने १२ महिन्यांचे नियोजन आखले. प्री परीक्षेसाठी तीन तास तर मेन्ससाठी १ तास असे नियोजन करून अभ्यास केला. दहावीपर्यंत गणित आणि इंग्रजी आपण नीट अभ्यास केला तर प्री परीक्षेत अॅप्टीट्यूट टेस्ट पास होणे कठीण नाही. जिके आणि आवांतर वाचन वाढवण गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत माहिती घ्यायला हवी. किमान २५ टेस्टपेपर वेळ लावून सोडवायला हवेत. सातत्य आणि डोक शांत ठेवून अभ्यास करायला हवा.

ही परीक्षा आपला निश्चय, पर्सनालिटी आणि कॉन्फिडन्स तपासणारी आहे. त्यामुळे मुलाखतीमध्ये कशा पद्धतीनं आपण उत्तरं देतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. घाबरून जाऊ नका या भीतीमधून स्वत:ला कायम सकारात्मक प्रेरणा द्या असा सल्ला अर्तिका शुल्काने दिला आहे.

-अर्तिका शुल्का

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News