सचखंड रेल्वेत आग लागल्याची अफवा; तरुणांच्या बेरकीपणामुळे प्रवाशांत घबराट

आनंद इंदानी
Friday, 7 June 2019

बदनापूर : अमृतसरहून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड अतिजलद रेल्वेच्या एका डब्याला गुरुवारी (ता. सहा) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास बदनापूर जवळ आग लागल्याची अफवा सर्वत्र पसरली. या अफवेमुळे प्रवाशांत घबराटीचे वातावरण पसरले. तर रेल्वे प्रशासनाचीही त्रेधातिरपीट उडाली. 

ही अफवा त्या डब्यातील काही टवाळखोर तरुणांनीच पसरवली होती. या गोंधळामुळे रेल्वे तब्बल 20 मिनिटे रेल्वे उभी करण्यात आली होती. शेवटी रेल्वे सुरक्षा पथकाने डब्यात जाऊन शहानिशा केल्यानंतर सचखंड रेल्वे जालन्याकडे मार्गस्थ झाली. 

अमृतसरहून नांदेडकडे जाणारी सचखंड अतिजलद रेल्वे गुरुवारी दुपारी एक वाजता बदनापूर रेल्वे स्थानकाहून जालन्याकडे रवाना झाली. मात्र पुढे एका डब्याला आग लागल्याची अफवा काही टवाळखोर तरुणांनी पसरल्याने प्रवाशी भयभीत झाले. कुणीतरी रेल्वेची चैन ओढल्याने ही रेल्वे शेलगाव (ता. बदनापूर) शिवारात थांबली. या नंतर अफवा पसरविणारी टवाळखोर मुले रेल्वेतून उतरून पसार झाले. मात्र या घटनेमुळे प्रवाशी घाबरले होते. त्यामुळे काही प्रवाशांनी देखील रेल्वे थांबल्यावर उड्या मारल्या. याबाबत बदनापूर व जालन्याच्या रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच तातडीने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना पाठवले. त्यांनी संपूर्ण रेल्वेची तपासणी केली असता कुठेही आग लागल्याचे निदर्शनास आले नाही. शेवटी संपूर्ण शहानिशा केल्यानंतर आग लागल्याची अफवा असल्याचे निदर्शनास आले. त्या नंतर रेल्वे जालन्याकडे मार्गस्थ झाली. 

"अमृतसरहून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड अतिजलद रेल्वेच्या एका डब्याला आग लागल्याची अफवा पसरली होती. रेल्वेची तपासणी केल्यानंतर ही बाब उघड झाली. अर्थात रेल्वे जालन्याकडे सुरक्षितरीत्या रवाना झाली आहे. तशी नोंद आमच्याकडे करण्यात आली आहे"

- विकासकुमार (स्थानकप्रमुख, बदनापूर)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News