राजे तुमचे गड-किल्ले भाड्याने?

सचिन गायकवाड, सातारा
Sunday, 8 September 2019

तुमचे गड-किल्ले भाड्याने देण्याचे
सरकारने मनावर घेतलंय
ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी
तुम्ही रक्त सांडलंय

राजे, तुमच्या आठवणींच्या खुणा
आता पुसल्या जाणार असंच वाटतंय

तुमचे गड-किल्ले भाड्याने देण्याचे
सरकारने मनावर घेतलंय
ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी
तुम्ही रक्त सांडलंय

तिथेच उद्या दारूच्या बाटल्या सांडणार असं वाटतंय
ज्या गड-किल्ल्यावर तुम्ही स्वराज्याचे तोरण बांधले
त्यावरच आता एखाद्या गर्भश्रीमंताच्या पोराच्या
शाही लग्नाचा मांडव घालणार असंच वाटतंय

तुमच्या नावाचा वापर करून पैसा कमावणारे
सतत तुमचा नामजप करणारे
जेम्स लेन प्रकरणाप्रमाणे
याहीवेळी शेपूट घालून बसणार असं वाटतंय

राजे, तुम्ही गड किल्ले बांधून चुकलात
स्वराज्याचे ठिणगी प्रत्येक ह्रदयात लावून चुकलात
तुम्ही हॉटेल रिसॉर्ट बांधायला हवे होते
निदान आज एमटीडीसीचा बोर्ड लागल्यावर
वाईट तरी वाटलं नसतं

पण होतंय ते चांगल्यासाठीच
आता हृदयातील स्वराज्याची ठिणगी
भडकेल तरी किंवा विझेल तरी
राजे,  …असंच वाटते

                   

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News