लातूरमध्ये यंदा राजस्तरीय युवा परिषदेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019

लातूर: तरुणाईच्या कलागुणांना वाव देणारा जिल्हास्तरावरील युवा महोत्सव २८ डिसेंबर रोजी लातुरात होणार असून त्यानंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवही यंदा प्रथमच लातुरात आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारने लातूरला संधी दिली आहे. हा महोत्सव ४ ते ६ जानेवारी या कालावधीत रंगणार असून राज्यातील ५०० हून अधिक स्पर्धक यात सहभागी होणार आहेत.

युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी राज्य शासनाने लातूर शहरामध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तर युवा महोत्सव आयोजन समितीची सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, तृप्ती अंधारे, शैलेश गोजमगुंडे, राम बोरगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे उपस्थित होते.
यावेळी जी. श्रीकांत म्हणाले, लातूर शहरामध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजनासाठी राज्य शासनाने संधी दिली आहे. या महोत्सवाचे नियोजन अधिकारीवर्गाने काटेकोरपणे करावे. युवा महोत्सव उत्साहात पार पाडावा. निवास, भोजन, वाहन व्यवस्थेची सोय करावी. त्याआधी कासगावडे यांनी या राज्यस्तरीय युवा महोत्सवात राज्यभरातून ५०० विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहेत, असे सांगून आयोजनाची विस्तृत माहिती, कार्यक्रमाचे रूपरेषा स्पष्ट केली.
 हा महोत्सव जिल्हा क्रीडा संकुल, दयानंद महाविद्यालयाचे सभागृह आणि दगडोजी देशमुख सभागृह या तीन ठिकाणी होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News