Video : 'मला कशासाठी भेटायचं होत?', राज ठाकरेंच्या प्रश्नाला चिमुरडीने पाहा कसं दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020
  • राज ठाकरे यांना भेटण्याचा अट्टहास या चिमुरडीने केला होता. राज ठाकरेंनी तो पूर्ण केला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. या चाहत्या वर्गात कोणीही मागे नाही. अगदी लहान मुलांना देखील राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची भुरळ पडते. याची प्रचिती एका व्हिडीओवरून होताना दिसत आहे.

राज ठाकरे यांना भेटण्याचा अट्टहास या चिमुरडीने केला होता. राज ठाकरेंनी तो पूर्ण केला आहे. 

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ती चिमुरडी आपल्या आई वडिलांसोबत राज ठाकरेंची भेट घेताना दिसत आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी मला का भेटायचं होते? असा प्रश्न विचारताच, त्या मुलीनं जे केलं त्यामुळे सर्वांचीच मने तिने जिंकली. राज ठाकरे यांनी देखील या मुलीला शुभाशीर्वाद देत एक भेटवस्तू दिली. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News