अखेर राज ठाकरे हिंदुत्वाचे निशाण फडकावणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 February 2020
  • याबरोबरच त्यांनी  तात्काळ बांग्लादेशी तसेच पाकिस्तानी  मुसलमानांच्या विरोधात एल्गार पुकारला आणि केंद्र सरकारनी जाहीर केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला अनुकूलता दर्शवली आणि अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणाला पाठिंबा देखील दर्शविला.
  • तसेच देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारायचे जाहीर केले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य्क्ष राज ठाकरे सध्या चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत. त्याच्यामागचे  कारण म्हणजे त्यांनी हाती घेतलेली कट्टर हिंदुत्वाची भूमिका. राज ठाकरे यांनी नुकतेच २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनाला आपल्या पक्षाचे आयडियॉलॉजी रिपोझिशनिंग केले.

याबरोबरच त्यांनी  तात्काळ बांग्लादेशी तसेच पाकिस्तानी  मुसलमानांच्या विरोधात एल्गार पुकारला आणि केंद्र सरकारनी जाहीर केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला अनुकूलता दर्शवली आणि अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणाला पाठिंबा देखील दर्शविला. तसेच देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारायचे जाहीर केले.

त्याप्रमाणे आज दुपारी आझाद मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरेंच्या नेतृत्वात ह्या  मनसेचा जनमोर्चाला  हिंदू जिमखान्यावरून  प्रारंभ झाला आहे. ह्या जनमोर्चाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर तरुणाई एकवटली आहे. राज्यभरातून तरुणाचा ह्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळतोय.

ह्या जनमोर्चाची सांगता हि राज ठाकरेंच्या भाषणाने आझाद मैदानावर होणार आहे. त्यामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागून राहिली आहे 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News