राज ठाकरे 'त्या' फोटोमुळे पु्न्हा चर्चेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020
  • ठाकरेंचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ'ने धुमाकुळ घातला होता. भर सभेमध्ये व्हिडीओ लावून अनेकांची पोल ठाकरेंनी खोलली होती. त्यामुळे लहान मुलांपासून ते वडीलधारऱ्या माणसांपर्यंत लाव रे तो व्हिडीओ पोहचला होता. सध्या राज ठाकरे एका नव्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

ठाकरेंचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये ठाकरेंनी ग्रे कलरचा टि- शर्ट आणि काळ्या रंगाचा जिन्स परिधान केला. पायमध्ये पाढऱ्या रंगाचे बुट घातले आहेत. आणि डोळ्यावर चश्मा, हातीची घडी घालून उभे टाकले आहेत. महत्त्वाच म्हणजे राज ठाकरेंनी दाढी वाढली आहे. त्यामुळे चाहत्यांना हा लुख खुप आवडला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट्स दिले आहेत. या फोटोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

राज ठाकरे नेहमी नेहरु- पयजामा, क्लिन शेव्हींग, पायामध्ये चप्पल आणि डोळ्यार चश्मा घालून राहतात, मात्र त्यांनी यापुर्वीही आपल्या पेहरावामध्ये बदल केला होता. बांग्लादेश आणि पाकिस्तानमधून घुसखोरी केलेल्या नागरिकांविरोधात मनेसेने एक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये राज ठाकरे नव्या लुकमध्ये उपस्थित होते.  ठाकरेंनी पांढऱ्या रंगाचा खमीस, पयजामा घातला होता. कपाळावर भगवा पट्टा ओढून उजव्या हातावर मनसेचा बिल्ला लागला होता, पायात करड्या व पाढऱ्या रंगाचे बुट आणि भगव्या रंगाची लेख बांधली होती. राज ठाकरेंचा भगवा लुक चाहत्यांना आकर्षित करत होता. या लुकवरही अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News