मनसेने केलं मोदींच 'या' कारणास्तव अभिनंदन...  

वृत्तसंस्था
Wednesday, 5 February 2020

मनसे भाजपाकडे वळते आहे हे चित्र हळू-हळू राजकारणाच्या पडद्यावर उमटायला लागले आहे.

मुंबई : राजकारणातील राजकीय वळणे कधी कुठे वळतील याचा काहीएक नेम नसतो. नुकताच मनसेने आपला ध्वज बदलला आहे. भगव्या झेंड्यामुळे मनसे हिंदुत्वाकडे वळते आहे असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी मांडला होता आणि याला खतपाणी देण्याचं काम देखील मनसेने केले होतं. विशेष म्हणजे मनसे ध्वजाच्या अनावरनावेळी स्टेजवर सावरकरांचा फोटो होता. दरम्यान काँग्रेस- सावरकर- भाजप असं आंतरिक युद्ध राजकारण्याच्या वर्तुळात सुरु होतं. याचवेळी भाजपने एनआरसी आणि सीएए सभागृहात मंजूर केलं होतं. विरोधी पक्षांनी याला कडाडून विरोध केला होता याचबरोबर देशाच्या विविध भागातून आणि राज्यातूनही मोठ्या प्रमाणात एनआरसी आणि सीएएला निषेध वर्तवला जात होता मात्र, ९ तारखेला मनसे एनआरसी आणि सीएए समर्थानात रॅली काढणार आहे. भाजपच्या या निर्णयाला मनसेने आपल्या रॅलीच्या माध्यमातून समर्थन दिले असल्याचे चित्र समोर आले. एकंदरीत मनसे भाजपाकडे वळते आहे हे चित्र हळू-हळू राजकारणाच्या पडद्यावर उमटायला लागले आहे.

 

यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधण्यासाठी सभागृहात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. मोदींच्या या निर्णयाचे स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे याचबरोबर मोदींना सल्ला देखील दिला आहे. ट्रस्टमुळे मंदीराच्या कामाला वेग येईल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी वर्तविली आहे. 

 

अभिनंदन करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, 'केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. 
ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन. 

दरम्यान आजच्या बैठकीत राममंदिराच्या संदर्भात अनेक निर्णय घेतले गेले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एक व्यापक योजनेची आखणी आखण्यात आली आहे. याचबरोबर श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News