पाऊस

पूर्वा बहाळकर
Tuesday, 20 October 2020

निसर्गाच्या सानिध्यात तुझ्यासोबत त्याने दिसावं
तो भुरभुरत असताना वाऱ्यानी तुझ्या लटांशी खेळावं

पाऊस

तू थांब म्हणावं आणि त्यानं बरसायच थांबावं
अस तुमचं आगळं नात जगाला कळावं

तुला भिजायचं नाही म्हटल्यावर त्याने थोडं रुसावं
तुला त्रास देण्यासाठी त्याने थोडं थोडं बरसावं

निसर्गाच्या सानिध्यात तुझ्यासोबत त्याने दिसावं
तो भुरभुरत असताना वाऱ्यानी तुझ्या लटांशी खेळावं

गाणी गुणगुणत बसलेल्या तूला त्याने ढगांमधून पहावं
त्याने थेंबानी तुझ्या बहरत्या तारुण्याला अजून मनमोहक बनवावं

बघ हा ! बघ हा !!
इतकं होऊनही त्याने तुला भिजवले नव्हते 
तुझं मन राखत त्याने फक्त ओठ स्पर्शीले होते

- पूर्वा बहाळकर

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News