आठवणीचा पाऊस

अंजली नितीन दामले, सातारा
Monday, 8 July 2019

अचानक आकाशात दाटून आले काळे ढग |
क्षणार्धात झाकोळून गेले सगळे निळे, पांढरे ढग |

 

अचानक आकाशात दाटून आले काळे ढग |
क्षणार्धात झाकोळून गेले सगळे निळे, पांढरे ढग |
 

सुरू झाला ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट |
विजांचा लखलखाट होऊन बरसल्या जलधारा |
 

त्या जलधारेत गारठून गेली संध्याकाळ |
ओलिचिंब झाली हिरवीगार पायवाट |
 

त्या जलधारेत कोणी धडपडतोय,तर कोणी कोणाला सावरतोय 
तर कोणी स्वप्नातील पाऊस सत्यात उतरण्याची वाट पाहतोय |
 

बरसणाऱ्या या जलधारा मध्ये कोणी शोधतोय हरवलेले आनंदाचे क्षण
तर कोणी या पावसात आपली आसवे लपवून हलके करतोय आपले मन |

हा पाऊस म्हणजे कोणासाठी गर्द गहिरा तर कोणासाठी हिरवे रान |
तर हा बरसणारा  पाऊस म्हणजे माझ्या मनातील ओसंडून वाहणाऱ्या आठवणींची शान .........|
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News