रेल्वे करणार १.४० लाख पदांसाठी भरती; 'या' दिवसापासून परीक्षा आयोजित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 September 2020
  • रेल्वे भरती मंडळाने अखेर एक लाखाहून अधिक पदांसाठी एनटीपीसी भरतीची तारीख जाहीर केली आहे.
  • एकूण १,४०,६४० पदांसाठी ही भरती तीन वेगवेगळ्या प्रकारात होणार आहे.

रेल्वे भरती मंडळाने अखेर एक लाखाहून अधिक पदांसाठी एनटीपीसी भरतीची तारीख जाहीर केली आहे. एकूण १,४०,६४० पदांसाठी ही भरती तीन वेगवेगळ्या प्रकारात होणार आहे. मार्च २०१९ मध्येच यासाठी अर्ज घेण्यात आले होते. देशभरातून सुमारे २.४० कोटी उमेदवारांनी १.४० लाख पदांसाठी अर्ज केले होते. एप्रिल २०१९ पासून कोट्यावधी उमेदवार या भरती परीक्षेची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत होते.

आता रेल्वेने जाहीर केले आहे की, आरआरबी नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरीज (आरआरबी एनटीपीसी) स्टेज -१ परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून सुरू होईल. ही परीक्षा संगणक मोडवर घेतली जाईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'भारतीय रेल्वेने विविध पदांच्या श्रेणीतील सर्व भरती प्रक्रियेच्या अर्जांची छाननी पूर्ण केली आहे. १५ डिसेंबरपासून विविध पदांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News