रेल्वेच्या प्रवासात असे नकळत घडू शकते

वैशाली वर्तक
Saturday, 8 June 2019

प्रवास म्हटला की आयोजन आलेच, सर्व साधारण पणे प्रवासास जावयाचे म्हणजे निघण्याची तारीख नक्की करणे, तसेच परतीची तारीख पण नक्की करणे व त्या प्रमाणे गाडयांची उपलब्धता  पाहून, आपल्या वेळे प्रमाणे योग्य तशी सोयीची गाडी आहे ना?

प्रवास म्हटला की आयोजन आलेच, सर्व साधारण पणे प्रवासास जावयाचे म्हणजे निघण्याची तारीख नक्की करणे, तसेच परतीची तारीख पण नक्की करणे व त्या प्रमाणे गाडयांची उपलब्धता पाहून, आपल्या वेळे प्रमाणे योग्य तशी सोयीची गाडी आहे ना? ते आपण पाहून घेतो, व त्या प्रमाणे दोन्ही आरक्षण करतोच. सध्या मुंबई काय, पुणे काय वा इतर सर्वच प्रवास आरक्षित केले असले तर सुखदायी, आरामदायी झालेले आहेत. मुंबई अहमदाबाद तर अगदी नेहमीच्या रुटीनचे झाले आहे. आम्ही पण अहमदाबाद-मुंबईचे व तसेच परतीचे पहिल्या वर्गाचे स्लीपर ए सी कोचचे आरक्षण करून ठरल्या दिवशी परतीचा प्रवास सुरु केला होता .

शेवटी अहमदाबादला पोहचलो. कधी एकदा अहमदाबाद येते असे झाले होते. आमच्या जवळ सामान विशेष नव्हते व आपल्याच म्हणजे स्वतःच्या शहरात परतत होतो, त्यामुळे स्टेशन वर घेण्यास कोणीही येवू नका. आम्ही आमचे येवू हे सांगितले होते. त्यामुळे न कोणाची वाट पहाता घरी पोहचलो.

घरी पोहचल्यावर मुलांनी विचारले कसा काय झाला प्रवास? सुटकेचा श्वास सोडत म्हटले कसले काय! रात्र भर जागेच आहोत. लगेच मुलांची प्रश्नांची प्रश्नावली झाली. म्हणजे? फस्ट क्लास एसीचे आरक्षित होते ना? आणि तुम्ही आलात त्यावरून कळतय की गाडी पण वेळेतच आलेली आहे. मग काय झाले? कुठे माशी शिंकली?

अरे! कसले आरक्षण विचारतो रात्र भराची झोप नाही. मुंबई अहमदाबाद गाडीला सीझन असा नसतोच नेहमीच गर्दी. सीटच्या एका टोकाला बसून, बसून कसले! कसे बसे बुड टेकवून रात्र काढली. बाजूची बाई जाम हलायला तयार नव्हती. नेहमी जी स्टेशने झोपेत जातात ती सर्व स्टेशने अगदी चक्क उघडया डोळ्यांनी पहिलीत. मधेच एखादे पोर जोर जोरात रडत होते. खाली, माझ्या पायाशी बसलेली बाई माझ्या पायांना,गुडघ्यांना मान टेकविण्याचे साधन म्हणूनच वापर करत होती. त्यात चहा विकणारे त्या गर्दीत चहाची किटली सावरत, चाय गरम,गरम चाय, ओरडत होते. तर मधेच ताजा वडा पाव, तर मधूनच पुरी भाजी असे ओरडत विक्रेते विक्रीचे काम आणि पैसे वसुलीचे काम सराहित पणे करत होते. रात्र झालेली असून रात्र आहे का दिवस कळत नव्हते. उभे असलेले प्रवासी आशाळभूत पणे बसलेल्या लोकांकडे पहात होते. 

पण कोणास दया येत नव्हती. चार जणांच्या सीट वर पाचव्या प्रवाशास जागा ,कशी तरी मिळाली होती. मिळाली कसली? मिळविली होती, व तो प्रवाशी पण पुन्हा पुन्हा बसण्याची पोझिशन बदलत होता. मधेच एखादी बाई खाली बसलेल्या प्रवाशांना "जरा जाऊ द्या ना" म्हणत कसरत करत कशी बशी टोयलेट पर्यंत जावून परत येत होती. त्यात विकणारे होतेच. मधेच कुणीतरी खावून झालेला खाण्याचा कागद इकडे तिकडे टाकण्याचा प्रयत्न करत होते. अथवा सीट खाली जागा दिसेल तेथे ढकलत होते. गाडी थांबली की थंडीचे दिवस असून सुद्धा गर्मी जाणवत होती. अग पण आरक्षित होते, फर्स्ट क्लास ए सी चे तिकीट होते त्याचे काय झाले? तिकीट हरविले की विसरलात व गाडीत बसल्यावर कळले की तिकीट नाही व पॅन नं पण नाही म्हणून? मुलांनी एकदम प्रश्नांचा बडीमार केला.

नाही रे! या वेळी आरक्षित आपण बोरीवली हून केले. कारण मुंबईची सर्व कामे आटपून उशिराची गाडी घेतली. नेहमी दादर अथवा मुंबई सेंटर पासून तिकीट घेतो, त्या गाड्या रात्री १२ च्या आधी सुटतात. त्या गाड्या बोरिवलीला येतात तोवर १२ वाजून जातात व दिवस बदलतो. तेच आमचे झाले. गाडी वेळेत च आली.तिकीट पण हातात होते. पण हातातील तिकीटाची तारीख आदल्या दिवशीची होती. त्यामुळे ते तिकीट निरुपयोगी ठरले. व आता मिळेल ती गाडी, मिळेल ते आरक्षण, वा नाही मिळाले तर आरक्षण न प्रवास करावा लागला ,कारण आज सकाळी पुन्हा येथे येणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे नाईलाजाने का होईना फर्स्ट क्लास ए सी चे तिकीट हातात असून आरक्षण न अगदी असहाय्य होवून अगदी असह्य असा प्रवास केला. तेव्हा सर्व नीट नियोजन करून पण कधी कधी असाही प्रवास घडतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News