रायकोट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • सुरत-बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला बांधण्यात आला.
  • तीन बाजूंनी तासलेले कडे आणि रायकोट किल्ला बांधण्यात आला.

सुरत-बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला बांधण्यात आला. तीन बाजूंनी तासलेले कडे आणि रायकोट किल्ला बांधण्यात आला. तीन बाजूंनी तासलेले कडे आणि रायकोट गावाच्या बाजूने असलेला नैसर्गिक खंदक यामुळे रायकोटचा किल्ला नैसर्गिकरित्याच बळकट आणि अभेद्य आहे.

रायकोट हा छोटेखानी किल्ला मुख्यत: व्यापारी मार्गावर टेहाळणी करण्यासाठी बांधण्यात आला होता. अहिर राजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा आकार आणि घेर पाहाता यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही.

रायकोट गावातून किल्ल्यावर जाताना दोन डोंगरामध्ये तयार झालेल्या नैसर्गिक खंदकांच्यावर तटबंदीचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते, त्यामुळे अनेक अवशेष नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या पठारावर एक बुरूज आणि तलाव पहायला मिळतो. किल्ल्याच्या तीन बाजूंना खोल दऱ्या आणि तासलेले उभे कडे आहेत. या दरीला माकडदरी म्हणतात.

मोरकरंज गावातून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर दगडात खोदून काढलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांजवळच १० फूट आणि २० फूट आकाराची गुहा आहे, पण ती रहाण्यास योग्य नाही. गडावरून माकडदरीचे अप्रतिम दृश्य दिसते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News