रायगडावर वनस्‍पती, पक्ष्यांचे संवर्धन गरजेचे! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 30 March 2019

रायगड  -  रायगड किल्ल्याच्या निसर्गसमृद्ध परिसरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. रायगड किल्ला संवर्धन प्रकल्पात कोट्यवधी रुपये खर्चून केवळ भौतिक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पर्यावरण हिताच्या दृष्टीने वनस्पती व पशु-पक्ष्यांचेही संवर्धन केले जावे, अशी मागणी गडप्रेमी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला, रायगडवाडी, वाघेरी खिंड, नाना दरवाजा, परिक्रमा मार्ग या परिसरात भुईआवळा, पांगारा, माकडी, निर्गुडी, रिठा, हरडा, वारस, आघाडा, रामेटा आदी ३५ प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. 

छोटा बसंत, स्वर्गीय नर्तक, नवरंग, आम्रपाली, डोमकावळा, पाकोळी, भूलचुकी, स्टारलेट मिनिवेट असे तब्बल २५० प्रकारचे पक्षी गडावर दिसतात, असे रायगडाचे अभ्यासक सुरेश वाडकर यांनी यावेळी सांगितले.

या वनसंपदेकडे सरकारचे फारसे लक्ष नाही, अशी खंत वाडकर यांनी व्यक्त केली. रायगड संवर्धनासाठी ६०० कोटींचा आराखडा तयार झाला आहे. त्यानुसार भौतिक सोई-सुविधांवर मोठा खर्च होत आहे.

 विकासकामांत पर्यावरण रक्षणाचा अंतर्भाव नसल्यामुळे वनसंपत्तीचा नाश होण्याची भीती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. ते अभ्यास दौऱ्यांदरम्यान ही निसर्गसंपदा गडप्रेमींना दाखवतात, पक्ष्यांचे आवाजही काढतात.
महाडमधील कोकणकडा मित्र मंडळ, सिस्केप संस्था यांनी रायगड परिसर वनक्षेत्र म्हणून राखीव करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाच वर्षांपूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी हा परिसर संरक्षित करावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.

गडाच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात दगड व मातीचे उत्खनन होत आहे. अनिर्बंध पर्यटनामुळे वनसंपदेचा नाश होण्याची भीती आहे, असे मत गडप्रेमींनी व्यक्त केले. गड संवर्धनासोबत वनसंवर्धनही व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्‍यामुळे रायगड किल्‍ल्‍यावरील पर्यावरणाच्‍या दृष्‍टीकोनातून वनस्पती व पशु-पक्ष्यांचेही संवर्धन महत्त्‍वाचे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News