रायगड जिल्हा खो-खो अजिंक्‍यपद व निवड स्पर्धेला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 10 December 2019

खो-खो या खेळाला चांगले भविष्य आहे; मात्र सरकारने शालेय पातळीवर खेळाबाबत होत चाललेल्या उदासीनतेला आवर घालायला पाहिजे.

उरण : खोपटे येथे रायगड जिल्हा खो-खो अजिंक्‍यपद व निवड स्पर्धेला रविवारी सुरुवात झाली. श्री गीरोबादेव मैदान इसार जेटी येथे शिवराय प्रतिष्ठान खोपटे येथे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ३८ पुरुष व २४ महिला संघांनी सहभाग घेतल आहे.

दोन सुसज्य मैदानांवर खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण खो-खो असोसिएशनच्या १५ पंचांची नेमणूक करण्यात आली आहे. लावण्या मगर या पंचांची प्रमुख म्हणून जबाबदारी पाहत आहे. स्फूर्ती आणि तग धरण्याची क्षमता तपासणाऱ्या या स्पर्धेत आर्चीत भोगावकर हा राष्ट्रीय खेळाडू व कौशल्य राणे हा विद्यापीठ खेळाडू अलिबाग क्रीडा संस्था या संघाकडून खेळत आहे.

या वेळी खोपटे गावाच्या सरपंच विशाखा ठाकूर, वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख बी. एन. डाकी व खोपटे गाव अध्यक्ष प्रकाश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती पुरस्कार विजेते नथुराम पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय मोरे, रायगड जिल्हा कार्यवाह आशीष पाटील, दीपक मोकल, रायगडभूषण अनिल गावंड, नीलेश भगत, विश्‍वास पाटील, घनश्‍याम घरत, ग्रामसेवक करिष्मा म्हात्रे, भावना पाटील, राजश्री पाटील, जागृती घरत, संदेश म्हात्रे आदी उपस्थित होते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News