राहुल गांधींचा अनोखा डान्स पाहिलात का?; व्हिडीओ व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

रायपुर (छत्तीसगड) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा एक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते पारंपरिक डान्स करताना दिसत आहेत. 

रायपुर (छत्तीसगड) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा एक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते पारंपरिक डान्स करताना दिसत आहेत. 

छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपुरमध्ये सध्या तीन दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव सुरु आहे. या महोत्सवास आज राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी झालेल्य़ा कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आदिवासी नृत्य करत सर्वांची मने जिंकली. तसेच त्यांनी पारंपरिक आदिवासी वाद्य वाजविण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांचा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वागत केले.

 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहूल गांधी यांनी अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मोदी सरकार हे देशातील 'सर्वधर्म समभाव' या संकल्पनेला धक्का पोहचवत असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. सध्याच्या आर्थिक स्थितीवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News