राहुल गांधीही रुपेरी पडद्यावर 

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 11 February 2019

राजकीय चित्रपटांचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये नव्याने सुरू झाला आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘ठाकरे’ यांसारखे राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले.

आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपटाची घोषणा झाली आहे. शिवाय चित्रपटाचा टीझरही सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या आयुष्यात काय बदल घडला? तसेच त्यांचा राजकीय प्रवास यात दाखवण्यात येणार आहे.

दिग्दर्शक रूपेश पॉल म्हणतात, ‘यात राहुल गांधी यांचा कोणताच मोठेपणा न दाखवता ते राजकीय क्षेत्रात खंबीरपणे कसे उभे राहिले, हे दाखवण्यात येईल.’ लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News