बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळणार राहीबाईंकडून मार्गदर्शन 

अश्लेषा ननवरे
Friday, 21 February 2020

दरवर्षीच्या ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यासाठी अनेक प्रतिष्ठीत आणि नामवंत पाहुण्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. ही व्याख्यानमाला 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाते.

ठाणे - दरवर्षीच्या ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यासाठी अनेक प्रतिष्ठीत आणि नामवंत पाहुण्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. ही व्याख्यानमाला 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाते. 

यंदा 25 फेब्रुवारी रोजी पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे आणि 26 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. राहीबाई पोपेरे  यांचे 'पारंपरिक बियाणे व शेतकरी' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर 26 फेब्रुवारी रोजी छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचे 'सामाजिक छायाचित्रकारिता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

पारंपारिक शेतीची तसेच बियाणांची माहिती मिळावी, रासायनिक गोष्टींचा पिकांच्या तसेच बियाणांच्या मार्फत आपल्या शरिरावर कसा परिणाम होतो याची माहिती आजच्या विद्यार्थ्यांना व्हावी, सोबतच सध्या बदलत चालले छायाचित्रांचे रूप आणि सुधारलेल्या पध्दती विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात यासाठी या व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानमालेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक आणि जनसंज्ञापन विभागाचे समन्ययक डॉ. महेश पाटील यांनी केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News