रेडिओ आता 'मोठा' झालायं !

विशाल जोशी
Thursday, 15 October 2020

रेडिओ इंडस्ट्री म्हणजे सेंट पर्सेंट कमर्शियलायझेशन. त्यात मग टार्गेट आॅडियन्स आयडेन्टिफिकेशन, चॅनल पोझिशनिंग, स्टेशनॅलिटी, आयडेन्टिटी (रेडिओची पर्सनॅलिटी) प्रोग्रॅम पॅकेजिंग, ब्रँड इंटिग्रेशन, साँग स्पाॅन्सरशिप, प्रोग्रॅम स्पाॅन्सरशिप, एफसीटी (फ्री कमर्शियल टाईम), आरजे मेन्शन, प्रोडक्ट टॅगलाईन्स, ओबी (कमर्शियल, एन्टरटेन्मेंट, सोशल, धार्मिक कार्यक्रमांच्या लोकेशनवर जाऊन होणारे आउटडोअर ब्राॅडकास्टिंग), स्टुडिओ शिफ्ट ( ३ ते ४ तासांसाठी एखादं शाॅप, आॅफिसचे उद्घाटन अशा ठिकाणी संपूर्ण मेक-शिफ्ट स्टुडिओ सेटअप करायचा आणि तिथून संपूर्ण ब्राॅडकास्ट करायचं) हे सर्व येतं.

रेडिओ अॅडव्हर्टायझिंग करिअर - भाग १

रेडिओ आता 'मोठा' झालायं !

विशाल जोशी

लेखक हे रेडिओ व्यावसायिक जाहिरात निर्माते आहेत. त्यांनी आतापर्यंत ३० हजाराहून अधिक जिंगल व रेडिओ स्पाॅट तयार केले आहेत. 

धून बदल के तो देखो... किंवा मिर्ची सुननेवाले आॅलवेज खूश... बजाते रहो... प्रत्येक शब्द, वाक्य वाचताना तुम्हाला वेगवेगळी रेडिओ चॅनल्स आठवली असतील... आणि नुसतीच आठवणार नाही तर तुम्ही सुद्धा त्याच तालासुरात ते उच्चारलंही असेल... रेडिओ अॅडव्हर्टायझिंगचे यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे काय असू शकते... अशीच अनेक जाहिरातींची उदाहरणं आपल्यासमोर आहेत किंवा येतील... पण हे असलं भन्नाट काहीतरी डोक्यात बसणारं जिंगल, ट्यून, मेसेज, अँथेम बनविणारं पब्लिक असतं तरी कुठं? आणि ते कुठून शिकतात हे सगळं?

ही सगळी लोकं तुमच्या-आमच्यासारखीच खूप काॅमन आहेत.. पण त्यांचे काम अनकाॅमन ठरतंय... कारण त्यांनी रेडिओमध्ये करिअर करायचं ठरवलं आणि ते यशस्वीही झाले.. अर्थात त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आपल्याला दिसत नाही पण ती असतेच... 

रेडिओमधील करिअर म्हटलं की प्रत्येकाला आपला आवडता किंवा आवडती आरजी म्हणजेच रेडिओ जाॅकीची आठवण येते. नक्कीच आरजे हे कुठल्याही रेडिओ स्टेशनचे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण या राईटअपमध्ये आपण रेडिओचा होलिस्टिक म्हणजेच सर्वंकष विचार करणार आहोत.

एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री, थिएटर, सिनेमा, रेडिओ, टेलिव्हिजन आणि आता ओटीटी प्लॅटफाॅर्म्स या सिक्वेन्सने एक एक अॅडिशन होत गेली आहे. एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये करिअर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ग्लॅमर, नाव, प्रसिद्धी. पैसा या चार गोष्टींची भुरळ पडते किंवा पडलेली असते. या सर्व गोष्टी रेडिओ क्षेत्रात आहेतच, पण त्यासोबत आहे ती प्रचंड मेहनत, तास न् तास चालणारे काम, सातत्याने करावा लागणारा अभ्यास, संशोधन, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अपडेट राहणे, तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे, लेटेस्ट फॅशन, ट्रेंड्स आणि लोकल, नॅशनल व ग्लोबल लेव्हलवरच्या घडामोडींविषयी अपडेट असणे. अशा अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

रेडिओपुरते बोलायचे झाल्यास, त्याच्या इन्व्हेन्शनपर्यंत न जाता आपण आॅल इंडिया रेडिओपासून सुरवात करूया. आॅल इंडिया रेडिओची सुरवात ८ जून १९३६ रोजी झाली. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रिदवाक्यामधून आॅल इंडिया रेडिओचे संपूर्ण स्वरूप आपल्याला कळते. देशातल्या काना-कोपऱ्यापर्यंत, देश-विदेशाच्या बातम्या, शिक्षण, आरोग्य, शेती अशा विविध सरकारी योजनांची माहिती, विविध विषयातील तज्ज्ञांच्या मुलाखती, मार्गदर्शन आणि संगीत.. आॅल इंडिया रेडिओची रूपरेषा काहीशी अशी होती आणि आजही बऱ्यापैकी तशीच आहे.

मनोरंजनासाठी यात हिंदी चित्रपट संगीत, प्रादेशिक चित्रपट आणि लोकसंगीत, छोटी छोटी नभो-नाट्य यांचा समावेश असतो. यामुळे इतर राज्यातील संगीत, संस्कृती, प्रथा, इतिहास, भूगोल, जीवनशैली, खाद्यसंस्कृती अशा विविध अंगाची माहिती आपल्याला घरबसल्या मिळू लागली. या अर्थाने संपूर्ण देशाला एकत्र आणण्यात आॅल इंडिया रेडिओचा सिंहाचा वाटा आहे. एकीकडे आॅल इंडिया रेडिओ हा प्रोग्रॅमिंग, टेक्निकल क्वाॅलिटी, मॅनेजमेंट, अॅडमिनिस्ट्रेशन, आॅडियन्स कनेक्ट अशा विविध स्तरावर उत्तरोत्तर प्रगती करत होता, त्याची लोकप्रियता वाढतच होती आणि आजही वाढत आहे.

साधारणतः २००१ मध्ये प्रायव्हेट रेडिओ स्टेशनचा उदय झाला. रेडिओ सिटी, रेडिओ मिर्ची, रेड एफएम, बिग एफएम, रेडिओ वन, माय एफएम, रेडिओ टोमॅटो या आणि अशा नॅशनल लेव्हल आणि रिजनल लेव्हलच्या अनेक रेडिओ स्टेशननी मार्केटमध्ये प्रवेश केला. रेडिओ क्षेत्रात क्रांती झाली. रेडिओला अधिक ग्लॅमर आले, अधिक युथ रेडिओ या मीडियमशी कनेक्ट झाला, कमर्शियलायझेशन झालं आणि खऱ्या अर्थाने रेडिओ इंडस्ट्री जन्मास आली. 

रेडिओ इंडस्ट्री म्हणजे सेंट पर्सेंट कमर्शियलायझेशन. त्यात मग टार्गेट आॅडियन्स आयडेन्टिफिकेशन, चॅनल पोझिशनिंग, स्टेशनॅलिटी, आयडेन्टिटी (रेडिओची पर्सनॅलिटी) प्रोग्रॅम पॅकेजिंग, ब्रँड इंटिग्रेशन, साँग स्पाॅन्सरशिप, प्रोग्रॅम स्पाॅन्सरशिप, एफसीटी (फ्री कमर्शियल टाईम), आरजे मेन्शन, प्रोडक्ट टॅगलाईन्स, ओबी (कमर्शियल, एन्टरटेन्मेंट, सोशल, धार्मिक कार्यक्रमांच्या लोकेशनवर जाऊन होणारे आउटडोअर ब्राॅडकास्टिंग), स्टुडिओ शिफ्ट ( ३ ते ४ तासांसाठी एखादं शाॅप, आॅफिसचे उद्घाटन अशा ठिकाणी संपूर्ण मेक-शिफ्ट स्टुडिओ सेटअप करायचा आणि तिथून संपूर्ण ब्राॅडकास्ट करायचं) हे सर्व येतं.

थोडक्यात, एन्टरटेन्मेंटला केंद्रस्थानी ठेवून त्या एन्टरटेन्मेंट एलिमेंट्सला प्राॅपर्टी करून, एन्टरटेन्मेंटला अधिकाधिक क्लायन्ट फ्रेंडली करून रेडिओ खऱ्या अर्थाने  यशस्वी आणि प्राॅफिटेबल बिझनेस माॅडेल म्हणून प्रस्थापित झाला. आणि त्यामुळेच रेडिओ इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढील लेखात आपण घेऊ.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News