क्षेत्ररक्षणाच्या सुमार कामगिरीवर आर श्रीधर यांचे उघड नाराजी नाट्य 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020
  • नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिका सुरु झाली या दोन्ही संघामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये देखील भारतीय संघाकडून अतिशय सुमार दर्जाची कामगिरी करण्यात आल्याने आर श्रीधर यांनी यावेळेस मात्र उघड-उघड नाराजी व्यक्त केली आणि  भारतीय संघाच्या संघ नेतृत्वाचे देखील चांगलेच कान टोचले असे समजते.
  • सामन्यादरम्यान काही वेळेस जिथे प्रतिस्पर्धी संघासाठी १ धाव शक्य असताना २ ते ३ धावा काढण्याची संधी देण्यात आली.

मुंबई :भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांमध्ये ५-० असा दणदणीत विजय मिळवला आणि संपूर्ण मालिका खिशात घालत न्यूझीलंड संघाचा व्हाईट वॉश केला. भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल टीम इंडियाचे विविध स्तरातून कौतुक होताना दिसत आहे मात्र टीम इंडियाच्या विजयी कामगिरीवर अभिनंदनाच वर्षाव न करता मालिकेदरम्यान टीम इंडियाकडून घडलेल्या सुमार क्षेत्ररक्षणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच टीम इंडियातील काही खेळाडूंना तर चांगलेच धारेवर धरले असल्याचे समजते.

नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिका सुरु झाली या दोन्ही संघामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये देखील भारतीय संघाकडून अतिशय सुमार दर्जाची कामगिरी करण्यात आल्याने आर श्रीधर यांनी यावेळेस मात्र उघड-उघड नाराजी व्यक्त केली आणि  भारतीय संघाच्या संघ नेतृत्वाचे देखील चांगलेच कान टोचले असे समजते. सामन्यादरम्यान काही वेळेस जिथे प्रतिस्पर्धी संघासाठी १ धाव शक्य असताना २ ते ३ धावा काढण्याची संधी देण्यात आली.

ओव्हरथ्रो देखील चुकीच्या पद्धतीने करण्यात आला त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला उत्तम कामगिरीची संधी मिळत गेली. काही वेळेस तर रन आऊटची संधी हुकली त्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक चांगलेच दुखावले गेले त्यामुळे यापुढे आता उरलेल्या मालिकेतील वन डे सामन्यांमध्ये तरी उत्तम अशी क्षेत्ररक्षणाचा कामगिरी करा असा कानमंत्रच आर श्रीधर यांनी दिला आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News